
पणजी, ५ जून (वार्ता.) – राज्यातील अनधिकृत डोंगर कापणीला आळा घालण्यासाठी नगर आणि शहर नियोजन मंडळाने कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘नवीन प्रावधानांनुसार डोंगर कापणीसंबंधी पहिल्या उल्लंघनासाठी ५० लक्ष रुपये, त्यानंतर पुन्हा नियमभंग केल्यास ७५ लक्ष रुपये आणि तिसर्यांदा उल्लंघन करणार्यांना १ कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे.

राज्यातील पर्यावरण आणि नैसर्गिक संपत्ती यांचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गोव्यातील डोंगररांगा, जलस्रोत आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात आणणार्यांच्या विरोधात सरकारची ‘शून्य सहनशीलता’ भूमिका रहाणार आहे.’’
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !