केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची अजब मागणी !
गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मागणी !

भिवंडी – हातभट्टीची दारू प्यायल्याने आजवर सहस्रो लोकांचा मृत्यू झाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड येथे १८ ते १९ जणांचा मृत्यू झाला. कामगार लोक मेहनत करून कुटुंब सांभाळतात. ताणतणावाच्या प्रसंगात ते हातभट्टीची दारू पितात. पोलिसांनी कितीही धाडी घातल्या, तरीही हातभट्ट्या चालूच असतात. एका ठिकाणची हातभट्टी बंद असली, तरी दुसर्या गल्लीमध्ये बाटल्या मिळतात. त्यामुळे ते कधीच बंद होत नाही. यापेक्षा हातभट्ट्या अधिकृत करा, यातून सरकारला महसूल मिळेल, तसेच गोरगरीब नागरिकांचे प्राण वाचतील, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सरकारला उद्देशून केले. ते भिवंडीत एका कार्यक्रमानिमित्त आले असतांना पत्रकारांशी बोलत होते.
Union Minister Ramdas Athawale backs legalising hand-brewed liquor after the Pune hooch tragedy.
He argues that regulation could curb illicit alcohol deaths and boost state revenue.
An NCP leader has also demanded lifting the liquor ban in Gadchiroli.
Prioritising revenue over… pic.twitter.com/fgTM6lJOLd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 3, 2026
‘विषारी दारू कधीपर्यंत पाजता ? गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवा’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केली आहे. दारूबंदी उठवण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (दारूबंदी उठवली गेली, तर ज्या भागांत दारूबंदी लागू केली आहे, तेथील धोरण किंवा तत्त्वे यांना तिलांजली दिल्यासारखे होईल ! – संपादक) ‘मोहाच्या दारूला कायदेशीर करा. आदिवासी संस्कृतीत जन्म, लग्न, मृत्यू अशा वेळेस लोक मोहाची दारू पितात’, असेही ते म्हणाले.
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक