
मुंबई – २ जूनच्या रात्री शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ घोषित केली. या योजनेद्वारे पात्र शेतकर्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येणार आहे.
१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले अल्पमुदतीचे पीककर्ज, तसेच पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जे यांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकित आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत न फेडलेल्या कर्जांचा योजनेमध्ये समावेश होणार आहे. २ लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ज्या शेतकर्यांनी अतिरिक्त रक्कम अधिकोषात जमा केल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे, अशा शेतकर्यांना अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत समयमर्यादा देण्यात आली आहे.
नियमित कर्जफेड करणार्यांना प्रोत्साहन
वर्ष २०२२ ते २०२५ या यांपैकी कोणत्याही २ आर्थिक वर्षांतील पीककर्ज नियमानुसार वेळेत फेडलेल्या शेतकर्यांना प्रति शेतकरी कमाल ५० सहस्र रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात आहे. आर्थिक शिस्त पाळणार्या शेतकर्यांनाही या योजनेतून लाभ देण्यात येणार आहे.
मंत्री, आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, २५ सहस्र रुपयांपेक्षा अधिक वेतन घेणारे शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी, आयकर भरणार्या व्यक्ती, तसेच २५ सहस्र रुपयांपेक्षा अधिक निवृत्तीवेतन घेणारे नागरिक यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही; मात्र माजी सैनिकांना या अटीतून वगळण्यात आले आहे.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !