
कर्णावती (गुजरात) – येथे ४ जूनपासून पहिली ‘जागतिक योगासन स्पर्धा’(चॅम्पियनशिप) चालू होणार आहे. या स्पर्धेमध्ये ४० हून अधिक देशांचे खेळाडू सहभाग घेतील. अमेरिकेचा योगासन संघदेखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी भारतात येणार आहे. ही स्पर्धा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, आयुष मंत्रालय आणि योगासन संस्था यांनी संयुक्तपणे आयोजित केली आहे.
ऑलिम्पिकमध्ये योगासनांना खेळ म्हणून समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट !
वर्ष २०३६ मध्ये होणार्या ऑलिम्पिकमध्ये योगासनांना खेळ म्हणून समाविष्ट करणे, हे भारताचे मुख्य उद्दिष्ट आहे. खेळाच्या स्वरूपात योगासनांना व्यापक आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्याच्या भारताच्या मोहिमेतील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. २७ मे या दिवशी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी वर्ष २०३० मध्ये होणार्या ‘कॉमनवेल्थ गेम्स’मध्ये योगासनंचा समावेश करण्याची घोषणा केली होती.
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !