
कसबा सांगाव (जिल्हा कोल्हापूर) – येथील माळ भागात असलेले मारुति मंदिर, बसवेश्वर मंदिर, चावडी चौक येथील मारुति मंदिर, बसस्थानक परिसरात असलेले मरगुबाई मंदिर आणि श्रीराम मंदिर या परिसरात मांसाहारी पदार्थांची दुकाने आहेत. धार्मिक स्थळाच्या १०० मीटर परिसरात मांसाहारी पदार्थांची विक्री न करण्याविषयी न्यायालयाचा आदेश असतांना त्याला हरताळ फासला जात आहे. तरी मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी कसबा सांगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील धार्मिक स्थळांच्या परिसरात असलेली मांसाहाराची दुकाने बंद करावीत, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने कसबा सांगावचे उपसरपंच श्री. विनोद आवळे यांना देण्यात आले.
या प्रसंगी माजी उपसरपंच विक्रमसिंह जाधव आणि श्री. बाळासाहेब हेगडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. अमोल माने, हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. बाबासाहेब भोपळे, सर्वश्री सतीष हसुरे, धोंडीराम चौगुले, अमोल आवळे, सुहास वंदुरे, विजय शेटे, विशाल पाटील, कुमार दिवटे, प्रभाकर थोरात, सचिन टाकळे उपस्थित होते. उपसरपंच श्री. विनोद आवळे यांनी या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा