
शिर्डी (अहिल्यानगर) – देहलीतील अज्ञात साईभक्ताने श्री साईबाबा यांच्या चरणी अनुमाने १५ लाख रुपये किमतीचा हिरेजडित मोरपिसांच्या आकारातील ब्रोच (मोरपिसाच्या आकाराची वस्तू) अर्पण केला आहे. अनुमाने ८० ग्रॅम वजनाच्या या ब्रोचमध्ये मौल्यवान ‘ब्राऊन डायमंड’ (तपकिरी हिरा) जडवण्यात आला असून तो सध्या साईबाबांच्या मूर्तीला परिधान करण्यात आला आहे. याआधीच २ दिवसांपूर्वी एका भक्ताने ९२ लाखांहून अधिक किमतीचा सुवर्ण मुकुट अर्पण केला होता. देणगी देणार्या भक्ताने आपली ओळख गोपनीय ठेवण्याची विनंती केल्याने संस्थानने ती घोषित केलेली नाही.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !