रत्नागिरीतील ‘परकार हॉस्पिटल’ला भीषण आग

५७ रुग्णांची सुखरूप सुटका

रत्नागिरी – येथील ‘परकार हॉस्पिटल’मध्ये पहिल्या मजल्यावरील डायलेसिस खोलीतील एसीला (AC) ‘शॉर्टसर्किट’मुळे आग लागली. आग लागताच प्रचंड धूर पसरल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

१. ही दुर्घटना घडली तेव्हा हॉस्पिटलमध्ये ५७ रुग्ण उपचार घेत होते. यामधील ७   रुग्ण आयसीयू (ICU) मध्ये भरती होते. आग लागल्याचे समजताच रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी तातडीने प्रथम सर्व ५७ रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे हालवले.

२. रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या सैनिकांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.

३. हॉस्पिटलचे डॉक्टर अलीमिया परकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आगीचे कारण, रुग्णांना हालवण्यासाठी करण्यात आलेली धावपळ आणि त्यांच्या सुरक्षेविषयीची संपूर्ण अधिकृत माहिती माध्यमांना दिली.

४. सर्व रुग्ण सुरक्षित असून नागरिक आणि रुग्णांचे नातेवाइकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.