Khandwa Madhya Pradesh Gharvapsi : बकरी ईदच्या दिवशी निष्पाप प्राण्यांच्या बलीदानामुळे त्रस्त बिलाल बनला ‘विशाल’ !

बिलाल नावाच्या एका मुसलमान तरुणाने हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करून स्वतःचे नाव ठेवले ‘विशाल’ !

खांडवा (मध्यप्रदेश) – खांडवा जिल्ह्यात बिलाल नावाच्या एका मुसलमान तरुणाने हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. त्याने स्वतःचे नाव ‘विशाल’ ठेवले आहे. शिव मंदिरात विधीवत् मंत्रोच्चारात त्याने सनातन धर्म स्वीकारला. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने विशालला ‘रामायण’ ग्रंथ भेट देण्यात आले.

विशाल याने सांगितले की, त्याला लहानपणापासूनच सनातन धर्माबद्दल ओढ होती. बकरी ईदच्या दिवशी निष्पाप प्राण्यांचे दिले जाणारे बळी पाहून तो त्रस्त झाला होता, म्हणूनच त्याने सनातन धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला.