‘सावरकर सदन’ला राष्ट्रीय स्मारक घोषित करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

मुंबईच्या निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापुरे यांना निवेदन देतांना शिष्टमंडळ

मुंबई – स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दादर येथील ऐतिहासिक ‘सावरकर सदन’ उपेक्षित राहिले आहे. या वास्तूवर पुनर्विकासाच्या नावाखाली ‘बिल्डर लॉबी’कडून भुईसपाट होण्याचे संकट आले आहे. ही वास्तू आतापर्यंत ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून जतन होणे अपेक्षित होते; मात्र तसे झालेले नाही. ‘सावरकर सदन’ शासनाने संपादित करून ते ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अन्य समविचारी संघटना आणि राष्ट्रप्रेमी यांच्या शिष्टमंडळाने मुंबईच्या निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापुरे यांना निवेदन दिले.

या वेळी सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर, अधिवक्ता अनेश परळकर, शिवकार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले, श्री. प्रकाश संघमिस्कर, अधिवक्ता राहुल पाटकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार, धर्मप्रेमी श्री. केदार चित्रे, श्री. सचिन पवार आणि श्री. प्रशांत देशमुख उपस्थित होते.