अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !

भारताचार्य सु.ग. शेवडे

‘पुराण म्हणजे प्राचीन इतिहास. एखाद्या डोंगरावर उभे राहून आपण दूरदूरचा प्रदेश पहातो, तेव्हा जवळचा प्रदेश सुस्पष्ट दिसतो. आपली नजर त्या पलीकडे जाते, तो त्या भागाचा तपशील अंधुक होतांना दिसतो आणि अगदी दूरचे केवळ डोंगरच दिसतात. त्यांच्या कडा आणि भुरकट आकारच दिसतो. तसा अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून आपल्याकडे ‘इतिहास-पुराणेषु’ असा शब्दप्रयोग वापरणे रूढ आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे एक सुंदर वचन आहे –

विश्व हा अनादि ठावो । येथ नियंता ईश्वर रावो ।
यापडिये न्यावो अन्यावो । निवडी वेदु ॥

वेदी अन्यायो घडे । तो निरय भोगे दंडे ।
सन्यायी तो सुखाडे । स्वर्गी जिये ॥

ऐसे हे विश्वव्यवस्था । अनादी जे पार्था ।
तयाते म्हणती वृथा । आघवेची हे ॥ – ज्ञानेश्वरी अध्याय १६

महाराज म्हणतात, ‘विश्व हे ठिकाण अनादी आहे. येथे नियंत्रण करणारा राजा ईश्वर हाच आहे. त्याच्या राज्यांत न्यायालयात न्याय-अन्यायाचा निवाडा वेदाज्ञेनुसार होतो. वेदाच्या दृष्टीने जो अन्याय करतो, तो नरकात जातो आणि जो न्यायाने वागतो, तो स्वर्गात जातो. अशी ही विश्वव्यवस्था आहे. हीसुद्धा अनादी आहे. तिला हे (नास्तिक लोक) सारे निरर्थक आहे, असे म्हणतात.’

– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.