
१. विस्थापित हिंदू छावण्यांमध्ये लोक कशा प्रकारचे जीवन व्यतीत करतात ? हे जाणून घ्या !
२. विस्थापित हिंदूंच्या छावण्यांना भेटी द्या !
३. बर्फाळ भागांत सैन्यदल दिवसरात्र कसे तैनात असते, याचा विचार करा आणि त्यांचे अनुभव वाचा.
४. प्रतिकूल परिस्थितीतही काही लोक हसतमुखाने संघर्ष कसा करतात ? हे जाणून घ्या !
५. संकटसमयी काही लोक शांत आणि संयमी कसे रहातात ? याचा अभ्यास करा.
६. संकटांचा सामना करणार्या व्यक्तींकडून प्रेरणा घ्या !
७. प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे कर्तव्य निभावणार्या लोकांचे जीवन जाणून घ्या !
८. ‘भीतीमुळे मी कोणती संधी गमावत आहे ?’, याचा विचार करा आणि भीतीमुक्त व्हा !
९. प्रतिकूलतेत मनोधैर्य टिकवण्यासाठी संत, राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांनी कोणते विचार दिले आहेत ? हे वाचा !
१०. क्रांतीकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किती हालअपेष्टा सहन केल्या ? ती तीव्रता अनुभवण्याचा प्रयत्न करा.
११. कठीण परिस्थितीत प्रसंगावधानता आणण्यासाठी मी माझ्यात कोणते गुण वाढवायला हवेत ? याचे चिंतन करा !
१२. आपत्काळात प्रशासन किंवा सरकार यांचे साहाय्य मिळेपर्यंत काय करायला हवे, याचा आतापासूनच विचार करा.
१३. दंगलग्रस्त भागातून आपण जात आहोत, तर आपल्याला कोणती काळजी घ्यावी लागेल ? याचा सतर्क राहून विचार करा.
१४. वैद्यकीय साहाय्य उपलब्ध नसल्यास प्रथमोपचार कसे करावेत, हे शिकून घ्या.
१५. सध्याच्या आरामदायी जीवनात कोणत्या सोयीसुविधांचा त्याग केल्यास शरीर आणि मन आपत्काळाच्या दृष्टीने सिद्ध होईल ?
हे स्वतःच पडताळा !
– एक राष्ट्रप्रेमी
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !