मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सादर केलेल्या जातीनिहाय जनगणना अहवालात उघड...

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र देण्यापूर्वी जातीनिहाय जनगणना अहवाल स्वीकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगा’ने राज्य सरकारला सादर केलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या अंतिम अहवालात मागासवर्गियांच्या आरक्षणाचे प्रमाण ३२ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. तसेच मुसलमान समाज राज्यात १४ टक्क्यांसह म्हणजेच ८० लाख १४ सहस्र लोकसंख्येसह सर्वांत मोठा समाज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
🚨 Muslims form the single largest community in Karnataka – revealed in the caste-based census reportX submitted to CM Siddaramaiah.
⚠️ The Centre has already rejected caste-based census politics, yet Congress is pushing divisive agendas to create rifts among Hindus.
❗Despite… pic.twitter.com/jRgu8Go2ni
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 28, 2026
अहवालात जातीनिहाय लोकसंख्येविषयी उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये १३ प्रकरणे असून प्रत्येक जातीची लोकसंख्या, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थिती यांसह सर्वसमावेशक माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार…
१. वीरशैव लिंगायत ११ टक्क्यांसह ६० ते ६५ लाख लोकसंख्या असलेला कर्नाटकातील दुसरा सर्वांत मोठा समाज आहे.
२. ओक्कलिगा १० टक्क्यांसह ५५ ते ६० लाख लोकसंख्या असलेला तिसरा मोठा समाज आहे.
३. कुरुबा समाज ८ टक्के असून ४० ते ४५ लाख लोकसंख्येसह राज्यातील चौथा सर्वांत मोठा समाज आहे. (जातीनिहाय जनगणनेच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा हा डावच आहे, हे लक्षात घ्या ! कर्नाटकातील हिंदूंनी सावध होऊन संघटित होणे, हीच काळाची खरी आवश्यकता आहे ! – संपादक)
मुख्यमंत्र्यांना जातीनिहाय जनगणना अहवाल सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष मधुसूदन नाईक म्हणाले की, अहवाल पूर्ण झाला आहे. तसेच मागासवर्गीय संदर्भातील अहवालही पूर्ण झाला आहे. हा अहवाल ३०० पानांचा आहे. या सर्वेक्षण प्रक्रियेत काही जण सहभागी झाले नाहीत. त्यामुळे आकडेवारी अल्प होण्याची शक्यता आहे. (याचा अर्थ अहवालातील माहिती ही अपूर्ण आणि चुकीचीच आहे. यामुळे या अहवालावरून होणारी कार्यवाहीसुद्धा सदोषच असणार. या अहवालाच्या विरोधात समाजहितैषी नागरिकांनी न्यायालय गाठले पाहिजे ! – संपादक)
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !