मंत्रालयात कार्यरत होणार ‘भारत फॉरकास्ट सिस्टीम’ !
श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई
मुंबई, २७ मे (वार्ता.) – यापुढे प्रत्येक १५ मिनिटांनी राज्यातील हवामानाचे अनुमान समजणार आहे. मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामध्ये पावसाळ्यापूर्वी ‘भारत पूर्वानुमान प्रणाली’ (भारत फॉरकास्ट सिस्टीम) चालू करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे प्रत्येक १५ मिनिटांनी राज्यातील अतीवृष्टी, वादळ यांविषयीची माहिती प्राप्त होणार आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने यंत्रणेला मोठे साहाय्य होणार आहे.
हवामान अंदाजासाठी महाराष्ट्राची आधुनिक वाटचाल !
हवामानाचा अचूक अंदाज जाणून घेण्यासाठी "भारत फोरकास्ट सिस्टीम" या अत्याधुनिक प्रणालीचा वापर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यासाठी ही प्रणाली अत्यंत परिणामकारक…
— Girish Mahajan (@girishdmahajan) May 21, 2026

भारतीय हवामानशास्त्र आणि पुणे येथील भारतीय उष्ण कटीबंधीय हवामान शास्त्र संस्था या प्रणालीशी संलग्न असणार आहेत. यापूर्वी एखाद्या १२ किलोमीटर भागातील हवामानाचे अनुमान प्राप्त होत होते. भारत पूर्वानुमान प्रणालीद्वारे मात्र आणखी सखोल म्हणजे ६ किलोमीटरपर्यंत जवळ जाऊन हवामानाचे अनुमान घेता येणार आहे.
आपत्ती व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेकडून ३ सहस्र २०० कोटी रुपयांचे कर्ज !
राज्यातील आपत्ती व्यवस्थापन बळकट करण्याच्या दृष्टीने जागतिक बँकेकडून राज्यशासनाला ३ सहस्र २०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. याद्वारे आपत्ती क्षेत्रांचे सर्वेक्षण, राज्यातील सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्रांचे आधुनिकीकरण आदी कामे केली जाणार आहेत. यामध्ये राज्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या आधुनिकीकरणासाठी ५३२ कोटी रुपये निधी असणार आहे. या अंतर्गत पन्हाळा आणि ज्योतिबा डोंगर येथील भूस्खलनाविषयी खासगी आस्थापनांकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे.

हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !