
नवी मुंबई, २७ मे (वार्ता.) – घणसोली पुलाखालून बजरंग दलाकडून ४ गायींची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती बजरंग दलाचे नवी मुंबईचे सहसंयोजक तेजस पाटील यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘ईदनिमित्त घणसोली पुलाखाली गायींना विक्री आणि कत्तल यांसाठी आणले आहे, अशी माहिती मिळाली होती. (ही माहिती पोलिसांना का मिळाली नाही ? – संपादक) त्या अनुषंगाने बजरंग दलाचे गोरक्षक तेथे पोचले. तेथील जावेदने गायी त्याच्या असल्याचे सांगितले. त्यावर कार्यकर्त्यांनी त्याच्याकडे गायींच्या मालकी हक्काची कागदपत्रे आणि महानगरपालिकेची नोंदणी देण्यास सांगितली; मात्र ते तो सादर करू शकला नाही. महानगरपालिकेच्या कर्मचार्यांच्या साहाय्याने गायींना सुरक्षितपणे कोंडवाड्यामध्ये पाठवण्यात आले.’’
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ