FIR Against Mamata Banerjee : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात एका वर्षानंतर सिलीगुडी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !

‘मी असा घाणेरडा धर्म मानत नाही’, अशी सनातन धर्माच्या विरोधात टिपणी केल्याचे प्रकरण

डावीकडून ममता बॅनर्जी आणि अधिवक्ता रिंकी चॅटर्जी सिंह

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात सिलीगुडी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांनी वर्ष २०२५ मध्ये कोलकाता येथे ईदनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सनातन धर्माला ‘घाणेरडा धर्म’ (गंदा धर्म) म्हटले होते. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.

१. ममता बॅनर्जी यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर सामाजिक माध्यमावर १ व्हिडिओ प्रसारित होत आहे. यामध्ये त्या म्हणतात, ‘एक घाणेरडा धर्म, जो ‘जुमला (खोटे आश्वासन देणे) पार्टी’ने बनवला आहे, आम्ही तो मानत नाही.’ (मग अशा धर्मात ममता बॅनर्जी का रहातात ? त्यांनी आतापर्यंत अन्य धर्म का स्वीकारला नाही ?, असे प्रश्न उपस्थित होतात ! – संपादक)

२. अधिवक्ता रिंकी चॅटर्जी सिंह यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. या विधानामुळे हिंदु समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे या तक्रारीत म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसचे काही नेते यापूर्वीही हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने करत आले आहेत, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

३. रिंकी चॅटर्जी सिंह यांनी दावा केला की, त्यांनी वर्ष २०२५ मध्येही तक्रार प्रविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्या वेळी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले गेले नाही आणि त्यांना छळाला सामोरे जावे लागले.

४. तृणमूल काँग्रेसच्या दार्जिलिंग गटाचे सरचिटणीस तथा अधिवक्ता अत्री शर्मा यांनीही हे विधान अनुचित असल्याचे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • ममता बॅनर्जी यांचे राज्य असतांना त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारही नोंद केली जात नव्हती, यावरून तेथे हुकूमशाही राज्य चालू होते, हे लक्षात येते !
  • सनातन धर्माच्या विरोधात असे विधान करूनही त्यांच्या विरोधात कधी ‘सर तनसे जुदा’ची (शिरच्छेदाची) घोषणा झाली नाही. हेच जर त्यांनी अन्य धर्मियांच्या विरोधात केले असते, तर काय झाले असते, हे वेगळे सांगायला नको !