तरुण पिढीला सावरण्यासाठी अध्यात्माचे कवच
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कृपापात्र आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजींचा स्तुत्य उपक्रम !

खामगाव (बुलढाणा) – आजची तरुण पिढी पाश्चात्त्य विकृती आणि वाममार्गाकडे वळत असतांना त्यांना संस्कारक्षम करण्यासाठी नांदुरा येथील आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी मोहीम उघडली आहे. ‘श्री गुरुदेव सेवा मंडळा’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील ७८ गावांमध्ये यंदा ‘सुसंस्कार शिबिरे’ आयोजित करण्यात आली असून यामध्ये अनुमाने अडीच लाख विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून बालमनावर अध्यात्माचे धडे गिरवले जात असून आदर्श राष्ट्रनिर्मितीसाठी तरुण पिढीला घडवण्यात येत आहे. पुणे, अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, वाशीम आणि जळगाव यांसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये या शिबिरांचा प्रसार झाला आहे.
४५ वर्षांपासून अविरत ज्ञानदान
नांदुरा खुर्द येथील ‘श्री गुरुदेव सेवाश्रमा’त वर्ष १९८१ पासून हा उपक्रम चालू आहे. यंदाच्या ४६ व्या वर्षी २२ एप्रिल ते २ मे या कालावधीत मुलींसाठी, तर त्यानंतर १२ ते १८ वर्षे वयोगटांतील मुलांसाठी शिबिरे आयोजित करण्यात आली. विदर्भासह मराठवाड्यातून आलेल्या शेकडो बालकांना तज्ञ प्रशिक्षकांद्वारे अध्यात्म, सुसंस्कार आणि शारीरिक प्रशिक्षणाचे धडे दिले जात आहेत.
व्यसनाधीनतेपासून दूर नेणारा मार्ग !
आजची बालके भ्रमणभाष आणि व्यसन यांच्या आहारी जाऊन स्वधर्म अन् संस्कृती विसरत चालली आहेत. हे भीषण वास्तव ओळखून आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी त्यांना आदर्श नागरिक बनवण्याचा विडा उचलला आहे. प्रारंभी या शिबिरांना पालकांचा प्रतिसाद अल्प होता; मात्र आता त्याचे महत्त्व पटल्याने सहभागी होणार्यांची संख्या प्रतिवर्षी वाढत आहे. या शिबिरांचा संपूर्ण खर्च लोकसहभाग आणि दानशूरांचे साहाय्य यांद्वारे केला जातो.
आदर्श शिक्षक आणि उच्चपदस्थ अधिकार्यांची निर्मिती !
या शिबिरातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज समाजात आदर्श जीवन जगत असून मोठ्या शासकीय पदांवर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे ज्यांना या कार्यात रस आहे, अशा प्रशिक्षित मुलांना गुरुजींनी प्रथम साहाय्यक शिक्षक आणि नंतर पूर्णवेळ शिक्षक म्हणून घडवले आहे, जे आता नवीन पिढीला मार्गदर्शन करत आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !