‘जमात-ए-इस्लामी’च्या प्रमुखाच्या घरावरही धाड !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने २५ मे या दिवशी ‘जमात-ए-इस्लामी’शी संबंधित आतंकवादी अर्थसाहाय्य प्रकरणात जम्मू-काश्मीरमधील अनेक भागात धाडी टाकल्या. शोपियाँ आणि श्रीनगर येथील ३ ठिकाणांवर केलेल्या या कारवाईच्या वेळी आतंकवादी अर्थसाहाय्याशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. शोपियाँमधील ‘आतंकवाद्यांचा अड्डा’ बनलेल्या ‘दारुल-उलूम-सिराजुल-उलूम’ या मदरशावर धाड टाकण्यात आली. ‘जमात-ए-इस्लामी’चा प्रमुख शहजादा औरंगजेब याच्या घरावरही अधिकार्यांनी धाड घातली. तसेच श्रीनगरमधील ‘जमियत-उल-बनात’ या मुलींच्या मदरशावरही धाड टाकण्यात आली.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘जमात-ए-इस्लामी’वर आतंकवादाला खतपाणी घालणे, फुटीरतावादी विचारधारेचे समर्थन करणे आणि जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रविरोधी कारवायांना प्रोत्साहन देणे इत्यादी आरोप आहेत.
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ