राज्यात आता सरकारी कॅन्टीनमध्ये ५ रुपयांत मिळणार ‘मासे-भात’ !

बंगालच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी

कोलकाता (बंगाल) – मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी घोषणा केली आहे की, राज्यातील सरकारी कॅन्टीनमध्ये लोकांना केवळ ५ रुपयांत ‘मासे-भात’ जेवण उपलब्ध करून दिले जाईल. सामान्य जनता आणि गरजू लोकांना स्वस्त दरात भोजन उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच संपूर्ण बंगालमध्ये विशेष कॅन्टीन उभारल्या जातील, जिथे लोकांना अत्यल्प दरात जेवण मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.