उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील सीमेवर १०० हून अधिक घुसखोर कुटुंबांची गर्दी

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होताच बांगलादेशी घुसखोरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे हे लोक पुन्हा बांगलादेशात परतत आहेत. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील सीमेवरील हाकिमपूर तपासणी चौकीवर १०० हून अधिक बांगलादेशी घुसखोर कुटुंबांसह बांगलादेशात परतण्यासाठी जमा झाले आहेत.
🚨 In Bengal, Bangladeshi infiltrators are fleeing back to Bangladesh out of fear of a potential BJP Government! 🇮🇳
📍 Large crowds of over 100 infiltrator families gathered near the border in North 24 Parganas district.
Statement by CM @SuvenduWB regarding infiltrators: “Flee… pic.twitter.com/ZBR6vH2ElP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 26, 2026
मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांना आदेश दिला आहे की, कुठेही एखादा बांगलादेशी घुसखोर सापडल्यास त्याला थेट सीमा सुरक्षा दलाच्या स्वाधीन करावे. आता त्यांना न्यायालयात नेले जाणार नाही, तर थेट बांगलादेशात परत पाठवले जाईल. यामुळेच बांगलादेशी घाबरले आहेत.
भाजप आमदार बिशाल लामा या घुसखोरांविषयी म्हणाले की, मागील सरकारने बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना आश्रय दिला होता; कारण ती त्यांची मतपेटी होती. आता त्यांना समजले आहे की, योग्य कागदपत्रांविना कोणत्याही देशात प्रवेश करण्याची किंमत काय असते ? ज्या अनेक लोकांची नावे मतदार सूचीच्या सखोल पुनरावलोकनाद्वारे काढून टाकण्यात आली होती, ते आता पळून जात आहेत किंवा त्यांना हद्दपार केले जात आहे. चौकशीमुळे अशा अनेक लोकांची नावे समोर येतील, ज्यांना मागील सरकारने आश्रय दिला होता. पूर्वी तृणमूल काँग्रेस निवडणुकीत फेरफार करायची, मतांची लूट करायची, जनतेला त्यांच्या अटींवर मतदान करण्याची संधी क्वचितच मिळायची.
लवकर पळून जा, आम्हाला तुम्हाला कारागृहात जेवण खाऊ घालायचे नाही !सीमेवर जमलेल्या बांगलादेशी घुसखोरांवर मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांचे विधान आम्हाला या घुसखोर बांगलादेशींना कारागृहात जेवण खाऊ घालायचे नाही, आम्ही त्यांच्यावर पैसे का वाया घालवू ? मी त्यांना सांगतो की, त्यांनी लवकर पळावे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी सीमेवर बांगलादेशात परत जाणार्या घुसखोरांवरून केली. |
शुभेंदु अधिकारी शासनाला तंतोतंत लागू पडणारे संस्कृतमधील हे प्रसिद्ध सुभाषित !दुर्जन प्रथमं वन्दे सज्जनं तदनन्तरम् । असे संस्कृतमधील प्रसिद्ध सुभाषित आहे. उपरोधिकपणे लिहिलेल्या या सुभाषिताचा अर्थ आहे – जसे सकाळी मुखप्रक्षालनापूर्वी (तोंड धुण्यापूर्वी) गुदद्वार स्वच्छ करतात, तसेच मी प्रथम दुर्जन माणसाला आणि नंतर सज्जन माणसाला वंदन करतो. बंगालमध्ये सध्या बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात उघडलेली मोहीम हा त्याचाच प्रकार होय. |
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !