जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांची केंद्र सरकारकडे मागणी
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

नवी देहली – बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी केंद्र सरकारकडे गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून या विषयावरून होणारे राजकारण आणि हिंसा कायमची थांबवता येईल.
🚨 Jamiat Ulema-e-Hind President has urged the Central Government to declare the cow as the “National Animal”.
After years of opposition, now even their tone seems to be changing. Hindus feel the Government should seriously consider this demand.
But a bigger question remains ❓… pic.twitter.com/TfbDAf3AC5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 26, 2026
‘जो कुणी गाय कसाईला विकतो, जो खरेदी करतो आणि जो तिचे मांस खातो, ते सर्व जण दोषी आहेत’, असेही मदनी म्हणाले. (देशात अनेक राज्यांत गोहत्यबंदी कायदा आहे. तरी मौलाना मदनी यांचे धर्मबांधव सर्रास गोहत्या करतातच. त्याकडे कानाडोळा करून ‘सरकारने काय करावे’, हे सांगून स्वत:वरील पाप झटकण्याचा मदनी यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असेच म्हटले पाहिजे ! – संपादक)
बकरी ईदसाठी गायीचा बळी देण्याचे कुठेही लिहिलेले नाही ! – माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी

आता यावर भारताचे माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनीही एक महत्त्वाचे मत मांडले आहे. ते म्हणाले की, अनेक लोकांमध्ये प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा आहे; कारण ते त्यांच्या धर्माच्या सिद्धांतांनुसार आहे. आता ती गाय असो, उंट असो किंवा बकरा असो. हा भाग वेगळा आहे. जर गायीचा बळी देण्यावर लोकांना आक्षेप असेल, तर सरकारने मौलाना मदनी यांच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला पाहिजे.
अन्सारी यांनी मुसलमानांना स्पष्ट संदेश देत म्हटले की, बकरी ईदसाठी तुम्हाला गायीचाच बळी दिला पाहिजे, असे कुठेही लिहिलेले नाही. तुम्ही बकर्याचाही बळी देऊ शकता. असे अनेक लोक आहेत, ज्यांची बकरा खरेदी करण्याचीही क्षमता नाही. मी यावर तोडगा शोधण्याचे काम भारत सरकार आणि त्यांच्या समजुतीवर सोडतो.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गोवंश तस्करी करतांना पकडलेल्या वाहनांचा तस्करीसाठी पुन्हा वापर !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !