
फोंडा, २५ मे (वार्ता.) – हिंदूंनी एकत्रितपणे कार्य केल्यास फोंडा येथील मर्दनगड संवर्धनाचे काम लवकर पूर्ण होईल, असे आवाहन फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर यांनी केले. नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर यांनी मर्दनगड संवर्धन समितीच्या सदस्यांसमवेत २४ मे या दिवशी सकाळी मर्दनगडावर भेट दिली. या वेळी नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर यांनी हे आवाहन केले. मर्दनगड संवर्धन समितीच्या वतीने या वेळी गडावर स्थानदेवतेचे पूजन करण्यात आले आणि गडावर भगवा ध्वज लावण्यात आला. या वेळी मर्दानगड संवर्धन समितीचे श्री. मनोज गावकर, श्री. राजेंद्र देसाई, श्री. सुचेंद्र अग्नी, शिवप्रेमी, बजरंग दलाचे श्री. पाटील आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. नगराध्यक्ष श्री. वीरेंद्र ढवळीकर यांनी मर्दनगडावर देवतेला पुष्पहार अर्पण केला.
या वेळी श्री. सत्यविजय नाईक उपस्थितांना उद्देशून म्हणाले, ‘‘गोवा सरकारने मर्दनगड किल्ल्याचे संरक्षण अन् संवर्धन करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. पुरातत्व खात्याने याविषयी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. मर्दनगड किल्ल्याचा इतिहास भावी पिढीपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. ही चळवळ पुढे चालूच रहाणार आहे.’
आतापर्यंत ज्या ज्या शिवप्रेमींनी मर्दनगड किल्ल्याचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न केले, त्या सर्वांचे समितीच्या वतीने आभार मानण्यात आले. बजरंग दलाचे श्री. नीलेश पाटील यांनी मर्दनगडाचा इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य सांगितले. त्यानंतर शिवप्रेमींनी किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पे वाहिली. या कार्यक्रमाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर