विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांना पत्र !

मुंबई – राज्यात ‘बकरी ईद’निमित्त संभाव्य गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. याविषयी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवले आहे.
२७ मे या दिवशी ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर काही भागांत मोठ्या प्रमाणावर गोवंशहत्या होण्याची शक्यता आहे. विशेषतः मालेगाव-नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, धाराशिव, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विशेष दक्षता घ्यावी. स्थानिक पोलीस प्रशासनाने संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवावी. अवैध जनावरांची वाहतूक रोखावी, तसेच ‘गोवंश हत्या प्रतिबंधक’ कायद्याची काटेकोरपणे कार्यवाही करावी. गोसंरक्षणासाठी कार्य करणार्या गोरक्षकांवर आक्रमणे होण्याची शक्यताही आहे. अशी कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक आणि सुरक्षात्मक कार्यवाही करावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !