ईश्वराची दया सर्व जिवांवर असतांनाही अभागी जिवाने त्याचा लाभ न घेणे

ईश्वराच्या दयेविषयी काय म्हटले जाते ? सर्व जिवांच्या मस्तकांवर भगवंताचा निरंतर हात आहे; परंतु अभागी जीव तो हात झटकून दूर करतात. जेव्हा असा जीव एखादे वाईट काम करण्यासाठी सिद्ध होतो, तेव्हा त्याच्याच हृदयातून ‘हे वाईट काम आहे’, असा ध्वनी येतो. त्याला अशा प्रकारची सूचना देणारा त्याच्या मस्तकावरील ईश्वराचा हात असतो. ईश्वर त्याला वेळीच सावध करत असतो. त्याच्या हृदयस्थ पुरुष ‘हे काम वाईट आहे’, असे त्याला सुचवत असतो; परंतु तो अभागी जीव प्रलोभनाला बळी पडून ईश्वरी संकेताची अवहेलना करून वाईट काम करण्यास प्र्रवृत्त होतो. तो त्याच्या डोक्यावरील भगवंताचा हात दूर करून त्या कृपासिंधूची अवहेलना करत असतो.

– (साभार : मासिक ‘कल्याण’, फेब्रुवारी २०२२)