बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्र्यांची चेतावणी !

मुंबई – बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर पशूवधृगहे आणि गोवंशियांवर होणार्या अमानुष अत्याचारांविरोधात राज्यशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. ‘गोमातेची तस्करी आणि कत्तल कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही’, अशी आक्रमक चेतावणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की,
१. विशिष्ट सणांच्या काळात गोमातेची तस्करी वाढते. गोवंशियांना कोंबून, उपाशी ठेवून, अमानुष पद्धतीने वाहनांमध्ये भरले जाते. हा केवळ कायद्याचा भंग नसून हिंदु समाजाच्या श्रद्धांवर घाला आहे.
२. राज्याने देशी गायीला ‘राज्यमाते’चा सन्मान दिला आहे. पवित्र गोमातेची कत्तल करून तिची अवैध वाहतूक करणार्यांना कायद्याचा कठोर धडा शिकवला जाईल. गोसंरक्षणासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे.
राज्यात विशेष पडताळणी मोहीम !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार २५ ते २८ मे या कालावधीत युद्धपातळीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी, सीमा पडताळणी नाके, तसेच वाहतूक यंत्रणा यांना परिवहन आयुक्त कार्यालयाने प्रसारित केलेल्या परिपत्रकानुसार, राज्यातील सीमावर्ती भाग, मुंबईसह प्रमुख शहरे अन् संवेदनशील मार्गांवर विशेष नाकाबंदी, तसेच वाहन पडताळणी मोहीम राबवण्यात येणार आहे. जनावरांची वाहतूक करणार्या प्रत्येक वाहनाची कसून पडताळणी केली जाईल. आवश्यक अनुमती, प्रमाणपत्रे आणि प्राणी कल्याण नियम यांचे पालन झाले का ?, याची पहाणी केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करून वाहने जप्त करण्यात येतील.
या मोहिमेत परिवहन विभागासह स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, पशूसंवर्धन विभाग आणि विविध गोसेवा अन् प्राणी कल्याण संस्था यांचा समन्वय साधण्यात येणार आहे. अवैध पशूवधगृहांना जनावरांचा पुरवठा रोखण्यासाठी विशेष पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. विशेष मोहिमेअंतर्गत कारवाईचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना देण्यात आले आहेत.
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
नाशिकला ‘गोमाता संवाद यात्रे’चे स्वागत !
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखडा : प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करणार ! – Bengal CM Suvendu Adhikari