
पुणे – ‘डेटिंग अॅप’वर (लोकांना जाळ्यात ओढणारी प्रणाली) मैत्रीचे आमीष दाखवून सायबर चोरट्यांनी कोंढवा येथील एका उद्योजकाची ७ कोटी ६१ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सायबर पोलीस ठाण्यात प्रविष्ट करण्यात आली.
ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांची ‘डेटिंग अॅप’वरून एका महिलेशी ओळख झाली. तिने चलन व्यवहारात गुंतवणूक केल्यास अधिकचा लाभ मिळेल, असे आमीष दाखवले. त्या महिलेने विविध अधिकोष खात्यात रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गेल्या दीड वर्षात त्या उद्योजकाने ७ कोटी ६१ लाख रुपये जमा केले. परताव्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला; परंतु ती रक्कम काढता आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे येथे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन !