Kolkata Runway Mosque : कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेली जुनी मशीद हटवली जाणार !

विमानतळ व्यवस्थापनाने अनेक वेळा सरकारला सांगूनही विमानांसाठी धोकादायक मशिदीच्या विरोधात नाही झाली कृती !

कोलकाता (बंगाल) – कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अत्यंत संवेदनशील भागामध्ये असलेली अनेक दशके जुनी मशीद हटवण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. जिल्हा प्रशासन आणि विमानतळ प्राधिकरण यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकाने मशिदीच्या जागेची पहाणी केली. त्यानंतर राज्य प्रशासन आणि मशीद कमिटी यांच्या प्रतिनिधींमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत विमानतळाच्या सुरक्षेचा हवाला देत मशिदीला इतरत्र हलवण्यावर भर देण्यात आला.

ही १३६ वर्षे जुनी ‘गौरीपूर जामे मशीद’ (जी ‘बांकरा मशीद’ म्हणूनही ओळखली जाते) एकेकाळी एका मोठ्या निर्जन भागात होती; मात्र विमानतळाच्या सततच्या विस्तारामुळे आज ती धावपट्टीच्या अगदी जवळ एका संवेदनशील भागात आली आहे.

विमानांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका

उत्तर २४ परगणा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत विमानतळ अधिकार्‍यांनी नकाशाद्वारे समजावून सांगितले की, मशिदीच्या अस्तित्वामुळे विमानांच्या सुरक्षेविषयी किती गंभीर आव्हाने आणि तांत्रिक अडचणी येत आहेत. मशीद कमिटीकडून बैठकीत उपस्थित असलेले माजी आमदार सिद्दीकुल्ला चौधरी म्हणाले की, आम्ही यावर एकटे निर्णय घेऊ शकत नाही. तुम्ही मोठ्या मुसलमान संघटनांशी संपर्क साधा.

यासंदर्भात विमानतळ संचालक विक्रम सिंह म्हणाले की, विमानतळाच्या आत असलेली ही मशीद पुष्कळ काळापासून वादाचा विषय आहे. यामुळे विमानांच्या वाहतुकीमध्ये येणार्‍या अडचणींबद्दल आम्ही अनेकदा सरकारला कळवले आहे. या संदर्भात एक प्रदीर्घ चर्चा झाली असून लवकरच सकारात्मक निकाल लागेल, अशी आम्हाला आशा आहे.

तपासणीनंतर नमाजपठण करणारे बसने जातात

सध्या दिवसातून ५ वेळा नमाजपठणासाठी १० ते २५ स्थानिक मुसलमान येथे येतात. प्रवेशद्वारावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल त्यांची कसून तपासणी करते. त्यानंतर त्यांना एका विशेष बसने धावपट्टी ओलांडून मशिदीपर्यंत नेले जाते आणि नमाजानंतर परत बसनेच प्रवेशद्वारापर्यंत सोडले जाते. शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी ही संख्या ८० पर्यंत पोचते. (किती हा द्राविडी प्राणायाम ! मुसलमानांच्या अतीव लांगूलचालनामुळेच आतापर्यंत हे चालू दिले गेले. ही मशीद आता हटवलीच पाहिजे, असेच कोणत्याही प्रायोगिक विचार करणार्‍या राष्ट्रप्रेमी नागरिकाला वाटेल ! – संपादक)

संपादकीय भूमिका

मुसलमानांच्या लांगूलचालनामुळेच हे सर्व चालू राहिले. जनतेचा जीव धोक्यात घालणार्‍या उत्तरदायी तृणमूल काँग्रेस सरकारमधील मंत्री आणि अधिकारी यांवर आता कारवाई व्हायला हवी !