Bhojshala : भोजशाळा संकुलातील इस्लामी चिन्हे हटवण्याची आणि उत्खनन करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी

प्रवेश शुल्कही रहित करण्याची मागणी

नवी देहली – भोजशाळा हिंदूंचे श्री वाग्देवी मंदिर असल्याचा निर्वाळा मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता या परिसरातून सर्व इस्लामी चिन्हे हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप पुन्हा प्रस्थापित करता येईल, असे यात म्हटले आहे. याव्यतिरिक्त याचिकाकर्त्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून संपूर्ण परिसराचे वैज्ञानिक उत्खनन करण्याची आणि सध्या तेथे आकारले जाणारे ‘प्रवेश शुल्क’ रहित करण्याची विनंती केली आहे. उत्खननामुळे या स्थळाचा खरा इतिहास आणि मूळ रचना स्पष्ट होईल, असे यात म्हटले आहे.