Bengal Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’च्या अनिवार्यतेला कट्टरतावादी मुसलमानांचा विरोध

आमदार हुमायू कबीर यांची न्यायालयात जाण्याची चेतावणी

आमदार हुमायू कबीर

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील भाजप सरकारने राज्यातील सर्व मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ गाणे अनिवार्य केल्याच्या निर्णयला मुसलमान संघटनांनी विरोध केला आहे. ‘आम आदमी उन्नयन पार्टी’चे अध्यक्ष असणारे आमदार हुमायू कबीर यांनी म्हटले की, मदरशांमधील लोक या निर्णयाशी कधीही सहमत होणार नाहीत. सरकार मदरसे चालवण्यासाठी कोणतेही आर्थिक साहाय्य देत नाही. मुसलमान स्वतःच्या वर्गणीतून मदरसे चालवत आहेत. गरीब मुलांना कुराणचे शिक्षण दिले जात आहे. अशा स्थितीत सरकारी धोरण त्यांच्यावर लादले जाऊ शकत नाही. हिंदु असो वा मुसलमान, प्रत्येकाला स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. आवश्यकता भासल्यास आम्ही न्यायालयात दाद मागू.

१. मौलानांचे म्हणणे आहे की, हा त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा भंग आहे. आम्ही या आदेशाविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करू.

२. ‘कोलकाता खिलाफत समिती’चे प्रमुख महंमद अशरफ अली कासमी यांनीही सरकारच्या निर्णयला विरोध केला आहे. ते म्हणाले की, आम्ही या देशात रहातो आणि देशावर आमचे प्रेम आहे; (हे प्रेम कधी दिसून कसे येत नाही ? – संपादक) परंतु आम्ही देशाची ‘पूजा’ करू शकत नाही. इस्लामनुसार मुसलमान केवळ अल्लाचीच पूजा करतात. ‘वन्दे मातरम्’मधील काही ओळी आमच्या धर्माच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहेत. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा.

सरकारने धर्माकडे नव्हे, तर विकासाकडे लक्ष द्यावे !

मुसलमान संघटनांचे म्हणणे आहे की, सरकारचे काम रोजगार देणे आणि विकास करणे हे आहे. सरकारने आरोग्य, रस्ते आणि कायदा-सुव्यवस्था यांकडे लक्ष दिले पाहिजे. कुणाच्याही धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणे हे सरकारचे काम नाही. (धर्माच्या आधारे सोयी-सुविधा मागतांना हे सूत्र कसे आठवत नाही ? – संपादक)

शाळांमध्ये हा नियम आहे, तर मदरशांमध्ये का नसावा ? – मदरसा शिक्षणमंत्री

राज्याचे मदरसा शिक्षणमंत्री खुदीराम टुडू म्हणाले की, शाळांमध्ये हा नियम आहे, तर मदरशांमध्ये का नसावा ? सरकारने जुने सर्व नियम रहित करून हा आदेश लागू केला आहे.

  • ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना (इस्लामचा अभ्यासक) साजिद रशिदी यांची मागणी

  • हुमायू कबीर बाहुला असून त्याला कारागृहात टाका !

आमदार हुमायू कबीर यांच्या बकरी ईदच्या दिवशी गायीचा बळी दिला जाणारच, या विधानावर ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी विरोध केला आहे. ते म्हणाले की, या माणसाचे कोणतेही अस्तित्व नाही. तो सरकारचा बाहुला आहे. अशा माणसाला कारागृहात असायला हवे. त्याला आधी तृणमूल काँग्रेसने स्वतःच्या कुशीत घेतले होते आणि आज भाजपनेही तसे केले आहे.

संपादकीय भूमिका

भारताची फाळणी धर्माच्या आधारे होऊन मुसलमानांना पाकिस्तान देण्यात येऊनही जे येथे राहून अशा प्रकारची धमकी देत असतील, त्यांना आता बांगलादेश किंवा पाकिस्तानात पाठवणे अपरिहार्य आहे !