अभाविपच्या विद्यार्थ्यांकडून इतिहास विभागाबाहेर निदर्शने

वाराणसी (उत्तरप्रदेश) – बनारस हिंदु विश्वविद्यालयाच्या एम्.ए. इतिहासाच्या चौथ्या सत्राच्या परीक्षेत ब्राह्मणांच्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावरून वाद निर्माण झाला आहे. या सूत्रावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित विद्यार्थ्यांनी विश्वविद्यालयाच्या इतिहास विभागाबाहेर निदर्शने केली. त्यांनी विश्वविद्यालय प्रशासनाकडे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. प्रश्नपत्रिका इतिहास विभागाच्या प्राध्यापिका सुतापा दास यांनी बनवली होती; मात्र वाद झाल्यानंतर त्यांच्याकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
Controversy at BHU over question on ‘Brahmanical patriarchy’
ABVP students protest outside the History Department demanding that the university administration review the concerned question, fix responsibility upon the guilty individuals, and ensure that in future no questions… pic.twitter.com/fnkQ5NWyZ1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 23, 2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विश्वविद्यालयाच्या प्रशासनाकडे मागणी केली आहे की, संबंधित प्रश्नाची समीक्षा करून दोषी व्यक्तींचे दायित्व निश्चित करावे आणि भविष्यात कोणत्याही प्रकारच्या वैचारिक पूर्वग्रहाने प्रेरित प्रश्न परीक्षा प्रक्रियेचा भाग बनू नयेत, याकडेही लक्ष द्यावे.
परीक्षेत प्रश्न काय होता?
एम्.ए. (इतिहास) चौथ्या सत्राच्या परीक्षेत ‘वुमेन इन मॉडर्न इंडियन हिस्ट्री’ यावर विचारलेल्या ‘ब्राह्मणवादी पितृसत्ताक व्यवस्थेने प्राचीन भारतात महिलांच्या प्रगतीत कोणत्या प्रकारे अडथळा निर्माण केला?’ या प्रश्नावरून वाद चालू झाला. विश्वविद्यालयाच्या मते, ब्राह्मणवादी पितृसत्ता हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट असून याच आधारावर प्रश्न विचारण्यात आला होता. प्रशासनाने सांगितले की, इतिहास विषयात विद्यार्थ्यांचे सर्वांगीण ज्ञान, विश्लेषणात्मक क्षमता आणि विविध दृष्टीकोन यांची समज विकसित करण्याच्या उद्देशाने असे विषय शिकवले जातात. कोणत्याही संकल्पनेवर शैक्षणिक वादविवाद आणि मतभिन्नता असणे स्वाभाविक आहे.

शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू