५० जनावरांची सुटका
२ रेड्यांचा गुदमरून मृत्यू
धर्मांध चालकाला अटक

छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील वैजापूर-नाशिक महामार्गावर गोवंश आणि इतर जनावरांची अत्यंत क्रूरपणे अवैध वाहतूक करणार्या ‘कंटेनर’चा (वाहतूक पेटीचा) गोरक्षकांच्या साहाय्याने पोलिसांनी पाठलाग करून तो कह्यात घेतला. या कंटेनरमधून ५० म्हशी आणि रेडे यांची सुटका करण्यात आली असून वाहनासह २२ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. तस्करांनी कंटेनरमध्ये क्षमतेहून अधिक जनावरे अत्यंत अमानुषपणे कोंबल्यामुळे गुदमरून २ जनावरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी कंटेनरचालक महंमद सैफ अफजल सैफ याला अटक केली आहे. यातील जनावरांना पुढील सुरक्षितता आणि उपचार यांसाठी हडसपिंपळगाव येथील ‘श्री रेणुकामाता गोशाळेत’ भरती करण्यात आले आहे.
१७ मे या दिवशी वैजापूर-नाशिक महामार्गावरून एक संशयास्पद कंटेनर वेगाने जात होता. या बंद कंटेनरमधून जनावरांचा मोठ्याने हंबरण्याचा आणि विव्हळण्याचा आवाज स्थानिक गोरक्षक श्री. अजय साळुंके आणि त्यांच्या सहकार्यांना आला. त्यांनी कंटेनर थांबवण्याची चेतावणी देऊनही धर्मांध चालक महंमद सैफ अफजल सैफ याने वाहन आणखी वेगाने पळवले. त्यानंतर गोरक्षकांनी पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी तातडीने कंटेनरला घेराव घालून कंटेनर कह्यात घेतला.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !