
मोडनिंब (जिल्हा सोलापूर) – ‘प्रस्तावित ‘शक्तीपीठ महामार्गा’साठी शेतकर्यांनी एक इंचही भूमी देऊ नये. सरकार आपली शेती कह्यात घेणार आहे. शेती संपली, तर आपण काय भीक मागणार का? त्यामुळे सर्वेक्षणासाठी येणार्या यंत्रणेला पळवून लावा’, असे आवाहन ‘शेतकरी संघटने’चे राजू शेट्टी यांनी केले. ते ‘शक्तीपीठ महामार्गा’च्या विरोधात सोलापूर-पुणे महामार्गावर अरण (ता. माढा) येथे ‘रस्ता बंद’ आंदोलनाच्या वेळी बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, ‘‘या महामार्गामुळे महाराष्ट्रातील देवस्थाने जोडणार, शेतकर्यांना पैसे मिळणार या सरकारच्या भूलथापांना भुलू नका. ४० सहस्र रुपयांचा हा महामार्ग १ लाख कोटींवर गेला आहे. या महामार्गाला आम्ही कोल्हापूर येथून विरोध केल्याने हा महामार्ग तुमच्यावर लादला जात आहे.’’
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !