१२ पैकी ७ मंदिरे हनुमंताची
स्थानिक हिंदूंची पालिकेत सत्तेत असणार्या भाजपवर टीका !

राजकोट (गुजरात) – येथे १४ मेच्या मध्यरात्री पालिकेने अनधिकृत असल्याचे सांगत एकाच वेळी १२ मंदिरे बुलडोझरद्वारे पाडली. यांपैकी ७ मंदिरे हनुमंताची आहेत. या विरोधात मोठ्या संख्येने हिंदूंनी रस्त्यावर उतरून निषेध केला. राजकोट महानगरपालिकेने स्थानिक लोकांशी संघर्ष टाळण्यासाठी रस्त्यांवरील लहान मंदिरे पाडण्याचे काम रात्री दीड वाजता चालू केले होते. अतिक्रमण हटवण्याची कारवाई पहाटे ५ वाजेपर्यंत चालू होती. यासाठी अधिकार्यांनी अग्नीशमन दल, दक्षता विभाग आणि स्थानिक पोलीस यांच्या साहाय्याने ही कारवाई केली. स्थानिक लोकांनी यावरून पालिकेत सत्तेत असणार्या भाजपवर कठोर शब्दांत टीका केली.
मालवीय नगर पोलीस ठाण्याजवळच्या एका हनुमान मंदिरालाही पाडण्याची नोटीस बजावण्यात आली होती; मात्र याची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि तरुण मोठ्या संख्येने मंदिराबाहेर जमा झाले. मंदिराबाहेर सलग ४ घंटे धरणे दिल्यानंतर विभागाच्या अधिकार्यांनी स्थानिक लोकांना आश्वासन दिले की, ते मंदिर परिसराचा रस्त्यावर येणारा एक छोटासा भागच पाडतील.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !