Kolkata Rajabazar Namaz : कोलकाता येथे पोलिसांच्या कडक भूमिकेमुळे मुसलमानांनी रस्त्यावर नमाजपठण करणे टाळले !

आधी पोलिसांना केला होता विरोध

राजा बाजार भागात जमा झालेले मुसलमान

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्याचा परिणाम तात्काळ दिसू लागला आहे. मुसलमानांनी येथील राजा बाजार भागातील रस्ता शुक्रवार, १५ मेच्या दुपारी नमाजपठणासाठी नेहमीप्रमाणे अडवला. त्याच वेळी पोलिसांनी त्यांना रस्त्यावर नमाजपठण करण्यास विरोध केला. मुसलमानांनी या विरोधात घोषणाबाजीही केली. या वेळी पोलिसांनी विरोध मोडून काढण्याची चेतावणी दिल्यावर मुसलमानांंनी माघार घेत रस्त्यावर नमाजपठण करणार नसल्याचे सांगितले.

विरोध करणार्‍यांवर कारवाई होणार !

मुसलमानांच्या विरोधामुळे परिस्थिती तणावपूर्ण होत असलेली पाहून प्रशासनाने येथे मोठ्या संख्येने अर्धसैनिक दलाच्या सैनिकांना तैनात केले होते. पोलिसांनी सांगितले की, जे उपद्रवी होते, त्यांची ओळख पटवली जाईल आणि त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. कुणालाही कायदा हातात घेण्याची अनुमती दिली जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

भाजप आमदाराने आधीच केले होते सुतोवाच !

बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर भाजपचे आमदार अर्जुन सिंह यांनी ‘आजतक’ वृत्तवाहिनीशी बोलतांना म्हटले होते की, राज्यात आता रस्त्यांवर नमाजपठण करण्याची अनुमती दिली जाऊ नये. नमाजपठणासाठी मशिदी बांधल्या गेल्या आहेत आणि लोकांनी तिथेच जाऊन प्रार्थना करावी.

संपादकीय भूमिका

  • बंगालमध्ये शुभेंदु अधिकारी यांच्या शासनाने योगी आदित्यनाथ शासन आणि हिमंत बिस्व सरमा शासन यांच्यापुढे जाऊन कठोर भूमिका घेऊन कार्य करत रहावे, अशाच हिंदूंच्या शुभेच्छा आहेत !
  • हिंदूंनो, तुमच्या, म्हणजेच भारताच्या हातातून निसटण्याच्या मार्गावर असलेल्या एका बंगाल राज्यात हिंदुत्वनिष्ठ भाजपची सत्ता आल्यावर अशा प्रकारे परिवर्तन घहू लागले असेल, तर विचार करा, पुढे भारतात हिंदु राष्ट्र आल्यावर काय घडून येऊ शकते. यामुळेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पुढे सरसावा !