ग्राहकांची वैयक्तिक माहिती धर्मांधांचे ‘लक्ष्य’ शोधण्याचे माध्यम !
पुणे – ऋषिका दत्ता ही महिला ‘इन्फ्लुएन्सर’ (सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ, लिखाण प्रसिद्ध करून लोकांवर प्रभाव टाकणारी व्यक्ती) येथील ‘सोशल’ हॉटेलमध्ये भोजनासाठी गेली होती. तिने पटलावरील ‘क्यू.आर्. कोड’ स्कॅन करून खाद्यपदार्थांची मागणी दिली. यात तिचा भ्रमणभाष क्रमांक हॉटेलच्या प्रणालीत नोंदवला गेला. रात्री घरी परतल्यानंतर तिला शेख शफी या कर्मचार्याने संदेश पाठवला, ‘‘मला तुझ्याशी मैत्री करायची आहे. मी तुला ड्रिंक दिले होते, तुझे वय काय आहे ?’’ याद्वारे तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ऋषिका यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, ‘क्यू.आर्. कोड’ स्कॅन करतांना तुम्ही केवळ जेवणाची मागणी करत नसून तुमची वैयक्तिक माहिती आणि सुरक्षा एका थाळीत सजवून अशा लोकांसमोर ठेवत आहात. (‘क्यू.आर्. कोड’ प्रणाली धर्मांधांसाठी हिंदु महिलांची वैयक्तिक माहिती गोळा करण्याचे आणि त्यांच्यापर्यंत पोचण्याचे सोपे माध्यम झाली आहे. याला ‘डेटा जिहाद’ संबोधणे वावगे ठरणार नाही; कारण यात नियोजित पद्धतीने महिलांच्या गोपनीयतेचा भंग केला जात आहे ! – संपादक)
‘डिजिटल डेटा’चा जिहादी मानसिकतेसाठी वापर !
ऋषिका यांनी म्हटले की, झोमॅटो, स्विगी आणि रॅपिडो या सेवांमध्ये हिंदु महिलांचे क्रमांक मिळवून त्यांना त्रास दिला गेला. आता हॉटेलमधील ‘क्यू.आर्. कोड’चा वापर करून धर्मांध स्वत:ची उद्दिष्टे साध्य करत आहेत. आज केवळ संदेश आला; पण जर मी पत्ता दिला असता, तर उद्या धर्मांध माझ्या दारावर असता.
हॉटेल व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा !
या प्रकारणी ऋषिका यांनी हॉटेल व्यवस्थापनाकडे तक्रार केली. व्यवस्थापनाने ‘कर्मचार्याला कामावरून काढले आहे’, असे सांगितले; मात्र महिलेने कर्मचार्याचे कामावरून काढल्याचे पत्र मागितले, तेव्हा व्यवस्थापनाने ‘ते आस्थापनाच्या धोरणात बसत नाही’, असे सांगून टाळले. २८ एप्रिलच्या या घटनेनंतर आजपर्यंत व्यवस्थापनाने लेखी क्षमा मागितलेली नाही किंवा ठोस कारवाई केल्याचे पुरावे दिलेले नाहीत.

सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील पद्धतीचा अभ्यास करणार ! – वनमंत्री गणेश नाईक
विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालक यांचे योगदान महत्त्वाचे ! – डॉ. ऋचा औरंगाबादकर