देहलीत बसमध्ये झालेल्या बलात्काराचे प्रकरण
नवी देहली – येथे ११ मेच्या रात्री ज्या धावत्या ‘स्लीपर’ बसमध्ये चालक आणि वाहक यांनी एका महिलेवर बलात्कार केला होता. ती बस बिहारमधील असल्याचे आणि या बसचा परवाना केवळ पर्यटनासाठी असतांना ती अवैधपणे प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात उघड झाले. ही बस देहली ते बिहार मार्गावर धावते.
Woman raped by driver and conductor in a moving bus
Accused arrested
The extreme insecurity faced by women in Delhi is a matter of great shame for all the governments that have ruled till now!
Will the Government at least now take action to ensure immediate capital punishment… pic.twitter.com/G4voXrb0cN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 15, 2026
बसचे पडदे लावलेले असल्यामुळे कुणालाही सुगावा लागला नाही !
प्राथमिक अन्वेषणात समोर आले की, बसमधील पडदे लावलेले होते. त्यामुळे बाहेरून काहीही दिसत नव्हते. ही बस वातानुकूलित असल्यामुळे तिच्या काचा बंद होत्या. त्यामुळे पीडितेच्या किंकाळ्या बाहेर ऐकू आल्या नाहीत आणि पडदे लावलेले असल्यामुळे रस्त्यावरून चालणार्या इतर लोकांना घटनेची कल्पनाही आली नाही. बसमधून पुरावे गोळा करण्यासाठी न्यायवैद्यक पथकाला (‘फॉरेन्सिक टीम’ला) बोलावण्यात आले आहे.
बसवर यापूर्वी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे अनेक गुन्हे !
अन्वेषणात असे समोर आले आहे की, गुन्ह्यात वापरलेली बस गोपालगंज जिल्ह्यात ‘साईं दृष्टी प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनेच्या नावावर नोंदणीकृत आहे. या बसवर १० लाख रुपयांहून अधिक दंड आहे. वर्ष २०२४ साली तिची नोंदणी झाली होती. बसच्या मालकाचे नाव हॅपी मल्होत्रा असून तो गोपालगंज जिल्ह्यातील रामपूर सदौवा या गावाचा रहिवासी आहे. त्याच्या बसवर यापूर्वी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याची १२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यात विम्याची कमतरता, अधिक क्षमतेने प्रवासी घेणे आणि सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष करणे यांचा समावेश आहे.

मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !