हलालाच्या नावाखाली पीडित मुसलमान महिलेवर प्रथम सासर्‍याकडून आणि नंतर दिराकडून बलात्कार !

आरोपींवर कठोर कारवाई करण्याची पीडितेची मागणी !

(हलाला म्हणजे मुसलमान महिलेला तलाक दिल्यानंतर तिला पुन्हा त्याच व्यक्तीशी विवाह करायचा असेल, तर त्यापूर्वी तिला दुसर्‍या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवावा लागतो.)

आग्रा (उत्तरप्रदेश) – आग्रा जिल्ह्यात एका विवाहित मुसलमान महिलेने आरोप केला आहे की, तिच्या पतीने तिला ३ तलाक दिला आणि त्यानंतर हलालाच्या नावाखाली  सासर्‍याने तिच्यावर बलात्कार केला, इतकेच नव्हे तर दिरानेही तिची अब्रू लुटली. पीडित महिलेने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

१. पीडित विवाहित महिलेने सांगितले की, तिला दोन मुले आहेत. सासरचे लोक अतिरिक्त हुंड्याची वारंवार मागणी करत आहेत.

२. हुंड्यामध्ये १ कोटी रुपये आणि ‘मर्सिडीज बेंझ’ ही अत्यंत महागडी चारचाकी गाडी देण्याची मागण्या पूर्ण न झाल्यामुळे ११ मे या दिवशी पतीने तिला ३ वेळा तलाक म्हटले.

३. १२ मे या दिवशी पतीने सांगितले की, तुला पुन्हा माझ्यासमवेत रहायचे असेल, तर हलाला करावा लागेल.

. यानंतर सासरा आणि दीर यांनी तिच्यावर बलात्कार केला. यास पीडितेने विरोध केला असता पती आणि सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली.

५. पीडित महिलेने पोलिसांशी संपर्क साधून तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिचा जीव वाचवला.

. या प्रकरणी मंटोला पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून पती, सासरा, सासू, दीर आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

७. दुसरीकडे पीडित महिलेच्या पतीनेही सासरच्या मंडळींविरुद्ध घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

अशा प्रकणांत महिला आयोग, स्त्रीमुक्तीवादी वगैरे कुठे असतो ? त्यांना हे दिसत नाही का ?