
हरिद्वार (उत्तराखंड) – येथील प्रतिबंधित क्षेत्रात ऑनलाईन मांसाहारी जेवण पोचवल्याच्या प्रकरणी पालिका प्रशासनाने ऑनलाईन वितरण आस्थापन ‘रॅपिडो’ला ईमेलद्वारे कडक चेतावणी दिली आहे. यात म्हटले आहे की, आस्थापनाला प्रतिबंधित क्षेत्रात अशा वस्तूंचे वितरण न करण्याविषयी आणि त्यांच्या कर्मचार्यांना तसे स्पष्ट निर्देश देण्याविषयी बजावले आहे. हरिद्वार हे मांस आणि मद्य प्रतिबंधित क्षेत्र असूनही काही ऑनलाईन वितरण आस्थापनांकडून येथे मांसाहारी पदार्थ पोचवले जात असल्याचे समोर आले होते. यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला होता.
पत्नीच्या छायाचित्रावर थुंकून तो गंगानदीत विसर्जित केल्याची घटना !
हरिद्वारमधील जगप्रसिद्ध हरकी पैडीवर येथील एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात एक व्यक्ती स्वतःच्या पत्नीच्या छायाचित्रावर थुंकल्यानंतर ते छायाचित्र गंगा नदीत प्रवाहित करतांना दिसत आहे. संबंधित व्यक्ती पत्नीच्या ‘रील’ (सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्यासाठीचे व्हिडिओ) बनवण्याच्या सवयीला कंटाळली होती आणि त्या रागातून त्याने जिवंत पत्नीचेच ‘पिंडदान’ केल्याचा दावा केला जात आहे.
कुत्र्याला गंगानदीत अंघोळ घातल्याची घटना !
काही दिवसांपूर्वीच एका महिलेने कुत्र्याला गंगेत आंघोळ घातल्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. सध्या अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत असल्याने तीर्थ पुरोहित आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यामध्ये संतापाची लाट आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गंगा नदीवर कोट्यवधी लोकांची श्रद्धा आहे; मात्र वारंवार अशा घटना घडत असतात. कधी तरुणींचे चित्रपट गीतांवरील नाच करणे, तर कधी तरुणांनी गंगा किनारी मद्यपान करणे असे व्हिडिओही प्रसारित होतात.
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !