
नागपूर – बंदी घातलेल्या ‘सीपीआय माओवादी’ या देशविघातक संघटनेचा प्रचार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. जहाल नक्षलवादी आणि केंद्रीय समिती सदस्य हिडमा याच्याशी संबंधित ५४ गाणी आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवरून हटवण्यासाठी ‘यू ट्यूब’ला अधिकृत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, वर्ष २००९ पासून नक्षलवादी संघटनांवर देशभरात बंदी आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित कोणत्याही साहित्याचा प्रचार करणे, गाणी वाजवणे किंवा त्यांचे उदात्तीकरण करणे हा कायद्याने गुन्हा आहे. पुणे आणि गडचिरोली येथे लग्नामध्ये हिडमाच्या गाण्यांवर नाचणार्या तरुणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत येणार्या नवीन उद्योगांना नक्षलवादाच्या नावाखाली धमकावणे किंवा खंडणी मागण्ो हे प्रकार वाढले आहेत. यावर कठोर भूमिका घेतली जाईल. उद्योगांच्या विकासात अडथळा आणणार्या खंडणीखोरांची गय केली जाणार नाही. दुर्गापूर पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून भविष्यातही अशीच कठोर कारवाई चालू राहील.’’
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !