टी.सी.एस्. मधील कॉर्पाेरेट जिहादच्या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचे प्रकरण

छत्रपती संभाजीनगर – नाशिक येथील बहुचर्चित ‘टी.सी.एस्.’ मधील कॉर्पाेरेट जिहादच्या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या प्रकरणी ‘एम्.आय.एम्.’चा माजी नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत घरावर महानगरपालिकेच्या प्रशासनाने १३ मेच्या सकाळी बुलडोझर चालवून ते भुईसपाट केले.
🚨 Bulldozer action in Chhatrapati Sambhajinagar!
Unauthorised house of AIMIM corporator Mateen Patel demolished after allegations of sheltering Nida Khan, the prime accused in the Nashik TCS ‘Corporate Jihad’ case.
⚠️ The consequences of aiding an accused involved in… https://t.co/QxKQnKIzZw pic.twitter.com/5m8sT54V7k
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 13, 2026
हिंदुद्वेष्ट्या आरोपीला साहाय्य केल्याचे परिणाम
पोलिसांच्या अन्वेषणानुसार धर्मांध निदा खान आणि तिचे कुटुंबीय यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षित आश्रय मिळवून देण्यात मतीन पटेल याचा मुख्य सहभाग होता. खान आणि तिच्या कुटुंबियांच्या केवळ रहाण्याचीच सोय नव्हे, तर कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठीही त्याने सर्व साहाय्य केले होते. या गुन्हेगारी कृत्यामुळे पोलिसांनी त्याला या प्रकरणात सहआरोपी केले आहे.
हे वाचा → मतीन पटेल याचे अनधिकृत घर पुन्हा बांधण्याची एम्.आय.एम्.’चे नेते इम्तियाज जलील यांची दर्पोक्ती !
प्रशासनाच्या कारवाईचे नागरिकांकडून पुष्पवृष्टी करत स्वागत !सकाळी ६ वाजता महानगरपालिकेने ही कारवाई चालू केली. ज्या घरात निदा खान ७ दिवस लपून बसली होती, त्या घरावरही लवकरच कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही कारवाई चालू असतांना तेथील जागरूक नागरिकांनी आनंद व्यक्त करत प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि आयुक्तांचे अभिनंदन केले. परिस्थिती नियंत्रणात रहाण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. |
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !