
हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हिंदुत्वनिष्ठांनाही जवळचे वाटतात. लवकरच ते भाजपमध्ये जाणार असल्याची टीकाही त्यांच्यावर होत असते; परंतु जगताप यांनी विविध जिहादांच्या विरोधात आवाज उठवणे सोडलेले नाही. ११ मे या दिवशीही त्यांच्या नेतृत्वाखाली आणि सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘प्रवासी जिहाद’ (ट्रॅव्हल्स जिहाद)च्या विरोधात पुणे-अहिल्यानगर महामार्गावर दुचाकी फेरीचा मोठा मोर्चा काढून रस्ता बंद करण्यात आला. या मोर्चाच्या फलकावरही ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे आमदार या उल्लेखाऐवजी त्यांनी ‘हिंदुत्ववादी आमदार’ हा उल्लेख करणे पसंत केले. ते स्वतःहून हिंदूंच्या बाजूने आवाज उठवतात. त्यामुळे हिंदूंमध्ये जागृती होते, हे महत्त्वाचे आहे. पुढे याविरोधात लढा तीव्र करणे आणि जागरूक रहाणे, हे प्रत्येक हिंदु प्रवाशाचे दायित्व आहे.
‘खुरासान’चे (संपूर्ण भारत इस्लामी करण्याचे) ध्येय साध्य करण्यासाठी भारताला अंतर्बाह्य पोखरून काढलेल्या विविध जिहादांमध्ये आता या आणखी एका जिहादची भर पडली आहे. तसे यापूर्वी राजस्थानमध्येही खासगी बसगाड्यांमध्ये हिंदु महिलांवर धर्मांधांकडून हात टाकण्याचे प्रकार घडले होते, आता ते महाराष्ट्रातही चालू झाले आहेत. लव्ह, लँड आणि आयटी जिहादप्रमाणेच भाजपच्या विविध आमदारांनी ‘स्कूल (शाळा) जिहाद’, ‘फ्रूट (फळ) जिहाद’, ‘कोचिंग (शिकवणी) जिहाद’, ‘डिलिव्हरी (प्रसुती) जिहाद’ यांवर गेल्या काही दिवसांत संग्राम जगताप यांनी आवाज उठवला आहे. हिंदु मुलींना पुढे फसवण्यासाठी जाळ्यात अडकवणे इथपासून बसमध्ये हिंदु मुलींवर अत्याचार करणे इथपर्यंत ‘प्रवासी जिहाद’चे स्वरूप व्यापक आहे. धर्मांधांच्या ट्रॅव्हल्सची तिकिटे मिळण्याच्या दुकानांमधून हा जिहाद चालतो. हिंदु मुलींनी तिकिटाचे पैसे दिले, तर त्यांना ऑनलाईन पैसे देण्यास प्रवृत्त करण्यात येते, जेणेकरून त्यांचा संपर्क क्रमांक मिळेल. नंतर त्यांच्याशी भ्रमणभाषवर संवाद (चॅटिंग) चालू होतो. त्यांना बसच्या वेळेपूर्वी एक घंटा आधी बोलावले जाते.
राज्य परिवहन महामंडळाच्या ‘शिवाई’ बसमध्येच धर्मांध वाहकाने प्रतिदिन प्रवास करणार्या हिंदु तरुणीशी अश्लील वर्तन करून तिची भावनिक फसवणूक (ब्लॅकमेल) केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या महिलेने तक्रार केल्यानंतर आगार प्रशासनाकडून हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाला, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. शिवनेरी गडावरील शिवाईदेवीचे दर्शन घेणारे आणि धर्मांधांना तलवारीचे पाणी पाजणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात या देवीच्या नावाच्या गाडीत धर्मांधांचे हे चाळे बिनधोक चालू रहाणे, हे चिंताजनक आहे. संबंधित कर्मचार्याला निलंबित करण्यात आल्याचे समजते; परंतु हा प्रकार उघडकीस येऊ नये, याची प्रशासन पुरेपूर काळजी घेत असल्याचेही जागरूक हिंदूंच्या लक्षात आले आहे. ‘अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमधील ‘पटेल’ नावाच्या धर्मांध जिहाद्याला ‘ट्रॅव्हल्स’च्या गाडीमध्ये हिंदु मुलीशी अश्लील कृत्य करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी कह्यात घेतले आहे. पुण्या-मुंबईतही हे प्रकार घडले आहेत’, असे जगताप यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी अगदी उघडपणे हिंदु महिलांना लक्ष्य करण्याचे जिहाद्यांचे धैर्य होते, हे चिंताजनक आहे. इतके दिवस पाकिस्तानमध्ये सार्वजनिक ठिकाणाहून मुलींचे, नववधूंचे अपहरण होतांनाचे हृदयद्रावक व्हिडिओ आपण पहात आलो आहोत. त्याचीच ही पहिली पायरी नव्हे का ?

जितेंद्र आव्हाड यांचे जिहादीप्रेम !
हिंदूंवरील आघातांच्या विरोधात आवाज उठवणारे आमदार संग्राम जगताप यांच्यावर हास्यास्पद टीका करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःचे हसे करून घेतले आहे. ‘स्वतःच्या महागड्या गाड्यांत घालायला येणारे पेट्रोल मुसलमान देशातून येते, ते घेणे बंद करणार का ?’, असे त्यांनी म्हटले आहे. आपण कितीही इस्लामी देशांशी व्यापार केला किंवा त्यांच्यावर अवलंबून असलो, म्हणून आपल्या लेकी-सुनांची मानहानी ही जिहाद करणार्या मुसलमानांच्या हवाली करायची का ? त्याचा आणि इंधन यांचा संबंध जोडणारे आव्हाड यांचे वक्तव्य बौद्धिक दिवाळखोरीच्याही पुढचे आहे. समाजमाध्यमांवर लोकांनी आव्हाड यांच्यावर टीका करतांना म्हटले आहे, ‘त्यांच्या मतदारसंघात त्यांना मुसलमानांनी हरवूनही हे त्यांचेच तळवे चाटायला जात आहेत.’ आतंकवादी इशरत जहांची वारंवार बाजू घेणारे आव्हाड उद्या एम्.आय.एम्.च्या (‘अखिल भारतीय मुसलमान एकता संघा’च्या) नेत्यांप्रमाणे जिहादी निदा खानची बाजू घेऊ लागले, तरी आश्चर्य वाटायला नको.
संग्राम यांनी हिंदूंना केले सावध !
मोर्चाच्या वेळी आमदार जगताप यांनी उन्हाच्या झळा सोसणार्या हिंदूंना भगतसिंग, छत्रपती संभाजी महाराज आदींनी देशासाठी बलीदान दिल्याची उदाहरणेही दिली. या जिहादसाठी पैसे पुरवले जात असल्याचे अत्यंत महत्त्वाचे सूत्र त्यांनी मांडले. मुलींना फसवणार्या जिहाद्यांना बक्षीस दिले जात असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांनी खासगी बसमधून प्रवास करतांना बसचालक कोण आहे ?, त्याच्या कपाळाला टिळा आहे कि नाही ?, हे पडताळून प्रवास करण्याचे आवाहनही हिंदूंना केले आहे. ‘कुटुंबातील लेकी-सुनांना तुम्ही बसआगारापर्यंत सोडायला जात असाल, तर घरच्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या किंवा खासगी बसगाड्या यांमधील चालक कोण आहे, हे पडताळावे, तसेच त्याचे ओळखपत्रही पाहू शकतो’, असेही ते या वेळी म्हणाले. ‘उद्याच्या पिढ्या सुरक्षित ठेवण्यासाठी आज काहीतरी केले पाहिजे. तुम्ही सगळे गेलात, तरी मी एकटा याविरोधात लढा देत राहीन’, असेही जगताप यांनी सांगितले.
हिंदूंचा धाक का वाटत नाही ?
बहुसंख्य हिंदु प्रवासी असतांना बसमध्ये एखादा मुसलमान हिंदु मुलीशी अश्लील कृत्य करूच कसे शकतो ? याचा अर्थ अन्य हिंदु प्रवाशांचा धर्मांधांना काहीच धाक वाटत नाही किंवा हिंदु एकत्र येऊ शकत नाहीत, हे ते जाणून आहेत. याला उत्तर देणे आता हिंदूंच्या हातात आहे. असे एखाद्या मुसलमान मुलीसमवेत होऊ शकते, याची आपण कल्पना तरी करू शकतो का ? यापुढे असे झाल्यास त्या धर्मांधांसमवेत कसे वागले पाहिजे, हे हिंदूंनी ठरवले पाहिजे. एकत्र न येण्याचा शाप हिंदू आता खोटा ठरवत आहेत; पण प्रशासन निर्ढावलेलेच आहे का ? केवळ १० सहस्र इंग्रजांनी लक्षावधी भारतियांवर राज्य केले, तसेच आता धर्मांध करू पहात आहेत. हे पालटण्यासाठी हिंदूंच्या संघटनशक्तीला पर्याय नाही !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !