
सांगली – पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध, तसेच दोषी नराधमावर पॉक्सो अंतर्गत कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन ‘सांगली जिल्हा समस्त ब्राह्मण समाजा’च्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

महसूल उपजिल्हाधिकारी श्री. कदम यांनी हे निवेदन स्वीकारले. जलद गती न्यायालयात खटला चालवावा, आरोपीस मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, तसेच या प्रकरणासाठी विशेष सरकारी अधिवक्ता म्हणून पद्मश्री उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. त्याचप्रमाणे राज्यातील अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची मागणीही करण्यात आली.

या वेळी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने मंजिरीताई गाडगीळ, कविता कुलकर्णी, अनिता वाटवे, मृदुला कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, मंगेश मंत्री, वैभव कुलकर्णी, ओंकार शुक्ल, विशाल कुलकर्णी, सचिन परांजपे, प्रशांत गोरे, मोहन कुलकर्णी, वामन बर्वे, चंद्रकांत धामणीकर, विनायक कुलकर्णी, अरविंद रूपलग, संजय रूपलग, मंगेश ठाणेदार यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करण्यासाठी नगरसेवक केदार खाडिलकर, मोहन वाटवे, विष्णु बर्वे, नीताताई केळकर, चंद्रकांत धामणीकर, संजय रूपलग, मंगेश ठाणेदार, रणजीत पेशकार, गौरी बर्वे, आकाश कुलकर्णी, दत्तात्रय रेठरेकर, गोविंद कुलकर्णी, श्रेयस गाडगीळ, मनोज देवधर, पूर्वा गर्ग, योगेश कुलकर्णी, प्रसाद करमरकर, शैलेश केळकर, अमोल कुलकर्णी, महेश कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, विश्वेश फडणीस, सुभाष कपूर, मेघना नेने, अनघा कुलकर्णी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !