ह.भ.प. संग्रामबापू भंडारे यांच्याकडून विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केल्याचे प्रकरण

पुणे – ‘वारकरी संप्रदायातील २० घुसखोर’, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जाहीरपणे केली होती. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संस्था, संघटना यांद्वारे निषेध व्यक्त होत होता. लवांडे यांच्यासारखी मंडळी स्वतःला विद्वान समजून समाजात विष कालवण्याचे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. आपण प्रवक्ते म्हणून हुशार असाल; पण वारकरी संप्रदायातील दिग्गजांवर बोलण्याइतकी कुणाचीच उंची नाही. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणू काठी।।’, अशी शिकवण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी दिली आहे. समाजाला दिशा देण्यासाठी प्रसंगी कठोर पावले उचलणे चुकीचे नाही. त्यामुळे विकास लवांडे यांच्याविषयी ह.भ.प. संग्रामबापू भंडारे यांनी केलेल्या शाईफेकीचे आम्ही जाहीर समर्थन करतो, असे वक्तव्य भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी केले. ह.भ.प. संग्रामबापू भंडारे आणि त्यांच्या सहकारी यांनी आळंदी येथे लवांडे यांच्यावर शाईफेक केली होती, त्याविषयी महेश लांडगे यांनी स्वत:ची भूमिका मांडली. ह.भ.प. संग्रामबापू हे आरंभीपासूनच धर्मनिष्ठ असून हिंदु धर्माचा प्रचार-प्रसार करण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. वारकरी संप्रदाय आणि धार्मिक परंपरांवरील टीका समाज सहन करणार नाही, अशी चेतावणी आमदार लांडगे यांनी दिली आहे.
आमदार लांडगे पुढे म्हणाले की,
१. वारकरी संप्रदायातील आदरणीय महाराज मंडळींविषयी लवांडे यांनी वापरलेले शब्द अत्यंत चुकीचे होते. समाजातील अशा प्रवृत्तींविरुद्ध लोकांमध्ये संताप असणे स्वाभाविक आहे. हिंदु धर्माच्या प्रचार, प्रसारासाठी काम करणार्या प्रबोधनकार, कीर्तनकार आणि संत यांचा आदर ठेवलाच पाहिजे.
२. ज्या २० व्यक्तींच्या संदर्भात लवांडे यांनी वक्तव्य केले आहे, त्यांचे सामाजिक कार्य त्यांनी आधी पहावे. हे महाराज समाजातील वंचित घटकांसाठी अविरत काम करत आहेत. हा राजकीय वाद नसून वैचारिक मतभेदाचा विषय आहे.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !