अहिल्यानगरमध्ये ‘ट्रॅव्हल्स जिहाद’ !
(‘ट्रॅव्हल्स जिहाद’ म्हणजे प्रवास करणार्या हिंदु महिलांना त्रास देण्याचा केलेला प्रयत्न)

अहिल्यानगर – ‘ट्रॅव्हल्स जिहाद’च्या (प्रवासी जिहाद) विरोधात आणि हिंदु महिलांच्या सुरक्षेसाठी ११ मे या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कायनेटिक चौक येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले. ट्रॅव्हल्स आणि सार्वजनिक वाहतुकीत हिंदु महिलांची छेड काढली जात असल्याचा आरोप करत या वेळी आंदोलकांनी घोषणा दिल्या. पुढील काळात अशा घटना घडू नयेत आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी आंदोलन केले आहे, असे संग्राम जगताप यांनी सांगितले.
आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की,
१. गेल्या काही वर्षांपासून आपण ‘लव्ह जिहाद’ ऐकायचो. मग ‘लँड जिहाद’चा उदय झाला. ‘व्होट जिहाद’चा उदय झाला आणि आता नुकताच नाशिक जिल्ह्यामध्ये ‘आयटी जिहाद’ पहायला मिळाला. आता ८ ते १० दिवसांपूर्वी ‘ट्रॅव्हल जिहाद’ पहायला मिळाला.
२. हिंदु महिला ज्या वेळी प्रवासासाठी गाडीत बसतात, त्या वेळी महिलांचा त्या लोकांशी संबंध येतो. तेव्हा महिलांना त्यांचे नाव विचारले जाते. सामाजिक माध्यमावर महिलांना ‘फॉलो’ केले जाते. त्यांचा भ्रमणभाष क्रमांक मिळवला जातो, त्यांच्या घरापर्यंत लोक जातात. हा ‘ट्रॅव्हल जिहाद’ आहे. (पोलीस याविषयी काय करणार ? – संपादक)
३. पूर्वी राजस्थानसारख्या राज्यांमध्ये बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीतून महिलांच्या अब्रूवर हात टाकण्याचे प्रकार घडायचे. तसाच प्रकार आता महाराष्ट्रात एका विशिष्ट ‘जिहाद’च्या माध्यमातून डोके वर काढत आहे.
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार अंतिम शिक्षा
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !