उत्साही, आनंदी आणि सेवेची तळमळ असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती क्षमा राणे (वय ७५ वर्षे ) !

‘श्रीमती क्षमा राणे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. काकूंच्या समवेत सेवा करणार्‍या साधिकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

श्रीमती क्षमा राणे

१. सौ. अदिती सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

१ अ. आधार वाटणे : ‘शिवणाशी संबंधित सेवा माझ्यासाठी पूर्ण नवीन होती. तेव्हा राणेकाकूंनी मला शिवणाशी संबंधित सेवेच्या संदर्भात सहजतेने मार्गदर्शन केले. तेव्हा मला काकूंचा पुष्कळ आधार वाटला.

१ आ. अडचणींवर मात करणे : एकदा आश्रमासाठी पडदे आणि इतर काही शिवण्यासाठी चांगल्या कापडाची आवश्यकता होती. याविषयी मी काकूंना विचारल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘आपल्याला चांगले कापड मिळेल. आपण याविषयी प्रसारातील साधकांशी बोलूया. त्यांचे साहाय्य घेऊया.’’ या प्रसंगातून ‘अडचणींवर मात कशी करायची ?’ हे मला शिकायला मिळाले.’

२. श्रीमती कांचन अकोलकर (वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

२ अ. राणेकाकूंचे रहाणीमान अत्यंत साधे आहे.

२ आ. काकूंमध्ये ‘व्यवस्थितपणा’ हा गुण आहे.

२ इ. प्रेमभाव

१. काकू आश्रमातील साधकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ (बिस्किटे, पाव, टोस्ट) बनवतात.

२. काकूंना स्वतःकडील खाऊ सर्वांना देतांना आनंद वाटतो.

२ ई. सेवाभाव

२ ई १. अल्प साधकसंख्या असूनही सेवा वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे : पूर्वी रामनाथी आश्रमात पायमशीन (पायाने चालवण्याचे शिवणाचे यंत्र) होती. त्या वेळी साधक संख्याही अल्प होती. राणेकाकू आणि आम्ही २ – ३ साधिका मिळून आश्रमासाठी पडदे, आसंद्या आणि यंत्रे यांवरील आच्छादने (कव्हर), गाद्या-उशांच्या खोळी इत्यादी शिवत होतो. त्या वेळी ‘सेवा अल्प वेळेत कशी पूर्ण होऊ शकते ?’, असे त्या पहात असत. अजूनही आम्हाला काकूंचे पुष्कळ साहाय्य होते.

२ इ २. सकारात्मक असणे : काकू प्रत्येक सेवा परिपूर्ण करतात. त्या नेहमीच सकारात्मक असतात. कुठलीही सेवा असली, तर त्या नकार देत नाहीत. ‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) मला सेवा करण्यास शक्ती देतात’, असे त्या सांगतात.

२ ई. शिकण्याची वृत्ती : काकूंचे एवढे वय झाले असूनही त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची पुष्कळ तळमळ आहे.

२ उ. साधकांना आधार देणे : मला प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांचा पुष्कळ आधार वाटतो. मी प्रत्येक गोष्ट काकूंना मोकळेपणाने सांगते. माझे यजमान रुग्णाईत असतांना राणेकाकूंनी मला पुष्कळ साहाय्य केले होते. ते मी कधीच विसरू शकणार नाही.

२ ऊ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव  

१. काकू नेहमी म्हणतात, ‘‘गुरुदेव आपल्याला एवढे सर्व देतात, तर आपण त्यांच्यासाठी आपले सर्वस्व द्यायला पाहिजे.’’

२. ‘हा आश्रम आपल्या गुरुदेवांचा आहे’, असा भाव ठेवून त्या सेवा करतात.

३. काकूंचा गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती) पुष्कळ कृतज्ञताभाव आहे.

‘प.पू. गुरुदेवांनी मला राणेकाकूंसारखी आध्यात्मिक मैत्रीण दिली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते आणि ‘राणेकाकूंमधील गुण आमच्यातही येऊ देत ’, अशी मी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते.’

३. सौ. प्रज्ञा चेतन परब, फोंडा, गोवा. 

३ अ. सतत सेवारत असणे : ‘श्रीमती राणेकाकू वय अधिक असूनही त्या सतत सेवारत असतात. त्या प्रत्येक सेवा उत्साहाने, आनंदाने आणि झोकून देऊन करतात. त्या अनेक सेवांचे दायित्व सहजतेने सांभाळतात.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १२.३.२०२६)