
प्रश्न –
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘मला सूक्ष्मातून अध्यात्माची प्राथमिक स्तराची माहिती मिळाली. पुढे सूक्ष्मातील ज्ञान प्राप्त करणार्या साधकांना (कु. मधुरा भोसले, श्री. निषाद देशमुख आणि श्री. राम होनप यांना) अध्यात्मातील विविध विषयांवर सूक्ष्मातून विस्तृत ज्ञान मिळू लागले. तसे मला का मिळत नाही ?’

उत्तर –
श्री. राम होनप :
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे ज्ञानकार्य बीजस्वरूपातील आणि ईश्वरी नियोजनानुसार असणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य ईश्वरी नियोजनानुसार चालू असते. त्यांना सूक्ष्म ज्ञानाद्वारे अध्यात्मातील प्राथमिक स्तराची माहिती मिळाली, तसेच त्यांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ या साधनामार्गाची निर्मिती केली. यांतून साधकांना ईश्वरप्राप्तीसाठी आवश्यक ते ज्ञान मिळाले. या ज्ञानामुळे साधकांना ईश्वरप्राप्तीचा सहज, सुलभ आणि अचूक मार्ग मिळाला. हे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे ज्ञानकार्य बीजस्वरूपातील होते.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्याची व्याप्ती पुष्कळ असणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांच्या कार्याची व्याप्ती व्यापक स्तरावर आणि पुष्कळ आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे अनेक साधकांना आध्यात्मिक प्रगती साध्य करण्यासाठी दिशा मिळते. त्यामुळे साधकांची जलद आध्यात्मिक प्रगती होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देहाद्वारे प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे ‘अनेक साधकांचे रक्षण होणे, त्यांना साधनेसाठी शक्ती मिळणे, तसेच वाईट शक्ती धर्मकार्यात आणत असलेले अडथळे दूर होणे’, ही कार्ये घडतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सूक्ष्मातून अध्यात्मातील विविध विषयांवर ज्ञान मिळवण्यापेक्षा काळानुरूप वरील स्थूल आणि सूक्ष्म या स्तरांवरील कार्ये करणे अधिक महत्त्वाचे आहे.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना घडवण्याचे कार्य !
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांचे सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना घडवण्याचे कार्य आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना अध्यात्मातील विविध विषयांवर प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांची उत्तरे त्या साधकांना गुरुकृपेमुळे सूक्ष्मातून मिळणार्या ज्ञानाद्वारे प्राप्त होतात. ही सेवा देऊन सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना ‘ज्ञान ग्रहण करण्यासाठी शक्ती आणि दिशा देतात, त्यांची ज्ञान मिळवण्याची क्षमता वाढवतात अन् त्यांची आध्यात्मिक प्रगती करून घेतात.’ या प्रक्रियेतून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या माध्यमातून बीजस्वरूपातील ज्ञानकार्याचा विस्तार करत आहेत !’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ते साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ९.१.२०२६, वेळ : दुपारी १२ आणि कालावधी : २० सेकंद)
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती