बुरखा घालण्यासाठी आणि मांस खाण्यासाठी बळजोरी

मुझफ्फरपूर (बिहार) – जिल्ह्यात एका हिंदु शिक्षिकेने तिच्या सासरच्या मंडळींविरुद्ध गंभीर स्वरूपाची तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. मुसलमान तरुणाशी विवाह केल्यानंतर आता सासरकडून तिच्यावर धर्म पालटण्यासाठी आणि इस्लामी प्रथा पाळण्यासाठी प्रचंड दबाव आणला जात आहे, असा आरोप तिने केला आहे. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिचे सासरे, सासू, दीर आणि जाऊ तिच्यावर बुरखा घालण्यासाठी आणि मांस खाण्यासाठी बळजोरी करत आहेत. या मागण्या मान्य न केल्यास तिला बेदम मारहाण केली जाते आणि जिवे मारण्याची धमकी दिली जाते.
🚨 Hindu Teacher in Bihar Alleges Harassment for Religious Conversion
A woman from Muzaffarpur alleged that after marrying a Muslim man, she faced relentless pressure from her in-laws to convert and follow Islamic practices – including being forced to wear a burqa and eat meat.… pic.twitter.com/k3A6MINpCP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 13, 2026
१. पीडित महिलेचा असाही आरोप आहे की, सासरचे लोक हा विवाह मान्य करण्यास सिद्ध नाहीत आणि स्थानिक पंचायतीच्या माध्यमातून तिच्यावर दबाव आणला जात आहे.
२. ‘माझा छळ करून मला बलपूर्वक धर्मपरिवर्तन करायला लावत आहेत’, अशी तक्रार तिने पोलीस ठाण्यात केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हुतात्मा विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय पद्धतीने अंत्यसंस्कार !
ग्राहकांना प्रतिदिन मिळणार अधिकाधिक २०० लिटर डिझेल !
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’चा मसुदा म्हणजे देवभूमीचे खासगीकरण आणि देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला !
ब्रिटन : युवतीवर बलात्कार करणार्या पाकिस्तानी नागरिक शेराज मलिकला १० वर्षांची शिक्षा !
महंमद समीर याने विद्यार्थिनीला गर्भपाताच्या बर्याच गोळ्या बलपूर्वक दिल्याने तिचा मृत्यू !
Mahalakshmi Kolhapur Suvarna Kalash : श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कळस बसवला !