
रायपूर (छत्तीसगड) – जांजगीर-चांपा जिल्ह्यातील बालोदा येथील ‘पी.एम् श्री शासकीय कन्या प्राथमिक शाळे’तील मुख्याध्यापिका लक्ष्मीदेवी भारद्वाज यांना विद्यार्थिनींवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणणे, तसेच सरकारी योजनेच्या पैशांत अफरातफर (घोटाळा) केल्याच्या प्रकणी निलंबित करण्यात आले आहे. (हिंदु नाव धारण करून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे असे बाटगे हे हिंदु धर्मासाठी घातक होय ! – संपादक)
१. गावकरी आणि विद्यार्थ्यांचे पालक यांनी तक्रार केली होती की, मुख्याध्यापिका शाळेत मुलांना ख्रिस्ती प्रार्थना आणि धार्मिक गीते गाण्यासाठी प्रवृत्त करत होत्या. मुख्याध्यापिकेवर झालेल्या आरोपांच्या तपासानंतर जिल्हा शिक्षण विभागाने ही कारवाई केली आहे.
२. सकाळच्या प्रार्थनासभेत त्या विद्यार्थिनींकडून राष्ट्र्रगीत ‘जन गण मन’ऐवजी ‘गॉड इज ग्रेट’ आणि ‘हालेलुया’ यांसारखी ख्रिस्ती गाणी गाऊन घेत असत. पालकांनी असाही आरोप केला की, त्या मुलींच्या मनात हिंदूंच्या देवता आणि परंपरा यांविषयी नकारात्मकता पसरवत होत्या.
३. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा शिक्षण अधिकार्यांनी चौकशी केली. अन्वेषणात असे समोर आले की, या आरोपांव्यतिरिक्त मुख्याध्यापिकेने सरकारी योजनांच्या अंतर्गत मिळालेल्या निधीतही गैरव्यवहार केला आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये त्यांनी कधी बनावट देयके दाखवून सरकारी निधी स्वतःच्या खात्यात जमा केला.
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखडा : प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !