हिंदु राष्ट्र समन्वय समिती आणि राष्ट्रीय वारकरी परिषद यांची पोलिसांकडे तक्रार !

मुंबई – हिंदु धर्म, संत आणि संघटना यांवर सातत्याने अश्लाघ्य टीका करणारे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. शाम मानव यांच्या ‘बुवा तेथे बाया’ या कार्यक्रमाला अनुमती नाकारावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समिती आणि राष्ट्रीय वारकरी परिषद प्रणित वैदिक हिंदू वारकरी बहुउद्देशीय सेवा संघ यांनी केली आहे. याविषयी या दोन्ही संघटनांच्या वतीने १० मे या दिवशी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. महिला पोलीस निरीक्षक शिर्के यांनी निवेदन स्वीकारले.
प्रा. शाम मानव यांनी हिंदु धर्म, संत, महंत आणि संघटना यांच्यावर बेछूट टीका केल्यास कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ‘बुवा तेथे बाया’ हे कार्यक्रमाचे नाव पहाता ‘सरसकट महिला अंधश्रद्धेपोटी बाबा-बुवा यांच्या मागे लागतात’, असा याचा अर्थ निघतो. त्यामुळे या कार्यक्रमाच्या नावातूनच समस्त स्त्रीवर्गाचा अवमान करण्यात आला आहे. स्त्रियांना एकप्रकारे चारित्र्यहीन लेखण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमातही स्त्रियांविषयी अवमानकारक वक्तव्ये होण्याची दाट शक्यता आहे, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दादर (पश्चिम) येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे १२ मे या दिवशी हा कार्यक्रम होणार आहे. निवेदन देतांना राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर, धर्माभिमानी स्वाती पांडेय, विद्या हरपुडे, सर्वश्री केतन शेंडे, विशाल ठक्कर, संतोष हरपुडे, राहुल पाटकर, सनातन संस्थेचे श्री. चंद्रकांत भदिर्के उपस्थित होते.
शाम मानव यांनी यापूर्वी केलेली आक्षेपार्ह वक्तव्ये !
यापूर्वी शाम मानव यांनी ‘ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले, हे धांदात खोटे सांगितले जात आहे’, ‘कुलकर्ण्यांचे १२ वर्षांचे पोर (संत ज्ञानेश्वर महाराज) भिंत काय चालवणार ?’, ‘संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले नसून त्यांची हत्या झाली आहे’, अशा प्रकारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे. पुणे येथील सुप्रसिद्ध ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक यांच्याविषयी खोटे लिखाण प्रसिद्ध केल्याविषयी पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी शाम मानव यांना एका दिवसाचा कारावास आणि आर्थिक दंड ठोठावला होता’ अशी उदाहरणेही या निवेदनांमध्ये देण्यात आली आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !