सासष्टी येथे पुन्हा ‘धिरयो’
(‘धिरयो’ म्हणजे बैल किंवा रेडे यांची झुंज)

मडगाव, १० मे (वार्ता.) – सासष्टी तालुक्यात एका ठिकाणी ‘धिरयो’चे आयोजन करण्यात आले होते; मात्र ‘धिरयो’ होण्यापूर्वीच पोलीस घटनास्थळी पोेचल्याने ‘धिरयो’च्या आयोजकांनी घटनास्थळावरून पलायन केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘कार्मोणा’ आणि ‘झालोर’ या नावाच्या २ बैलांमध्ये झुंज होणार होती आणि यासाठी आयोजक आणि प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते. ‘धिरयो’ होण्यापूर्वीच पोलीस घटनास्थळी पोचल्याने ‘धिरयो’ रहित करण्यात आला. पोलीस घटनेचे पुढील अन्वेषण करत आहेत. प्राण्यांवरील क्रूरतेवरून ‘धिरयो’च्या आयोजनावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. सध्या प्रशासन न्यायालयाच्या आदेशाचे कठोरतेने पालन करण्यासाठी प्रयत्नशील आहे; मात्र सासष्टी तालुक्यात ठिकठिकाणी ‘धिरयो’चे आयोजन केले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत.
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !