जतन, संवर्धन आणि दुरुस्ती कामांच्या पार्श्वभूमीवर निर्णय

पुणे – श्री मयुरेश्वर मंदिर, श्री चिंतामणी मंदिर आणि श्री सिद्धिविनायक मंदिर ही मंदिरे १० मेपासून ९ जून या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. ‘अष्टविनायक विकास आराखड्या’च्या अंतर्गत, तसेच पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या जतन, संवर्धन आणि दुरुस्ती कामांच्या पार्श्वभूमीवर ही मंदिरे बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती पुरातत्व विभागाकडून देण्यात आली आहे. या कालावधीत मंदिरांमध्ये नित्य पूजाअर्चा आणि धार्मिक विधी नियमितपणे चालू रहातील; मात्र भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध रहाणार नाही. मंदिरांचे पुजारी, बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी, कर्मचारी आणि विश्वस्त यांच्याविना अन्य कुणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या कामाच्या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती कामात अडथळा निर्माण करू शकते, तसेच कामाचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिक आणि भाविक यांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !